AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar: लग्न न करताच 2 मुले, ‘धुरंधर’मधील अभिनेत्याने 6 वर्षे डेट केल्यानंतर केला साखरपुडा

Dhurandhar: सध्या सगळीकडे धुरंधर या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आता या चित्रपटाता काम केलेल्या अभिनेत्याने गुपचूप साखरपुडा केल्याचे समोर आले आहे.

Dhurandhar: लग्न न करताच 2 मुले, 'धुरंधर'मधील अभिनेत्याने 6 वर्षे डेट केल्यानंतर केला साखरपुडा
Dhurnadhar ActorImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 14, 2025 | 12:48 PM
Share

रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना स्टारर ‘धुरंधर’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील प्रत्येक कलाकारची चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटात काम करणाऱ्या एका अभिनेत्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. या अभिनेत्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर दुसऱ्या गर्लफ्रेंडसोबत तो गेली 6 वर्षे रिलेशनशीपमध्ये आहे. त्यांना दोन मुले देखील आहेत. आता या अभिनेत्याने साखरपुडा केल्याचे एका शोमध्ये सांगितलं. हा अभिनेता कोण आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घ्या त्याच्याविषयी

आम्ही ज्या अभिनेत्याविषयी बोलत आहोत तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अर्जुन रामपाल आहे. अर्जुन रामपाल सध्या आपल्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या प्रचंड यशाचा आनंद घेत आहेत. याच दरम्यान त्याने गॅब्रिएला डेमेट्रिएड्सशी साखरपुडा केल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंग आणि अक्षय खन्नाच्या अभिनयाची मोठ्या प्रमाणात स्तुती होत असताना, अर्जुनच्या भूमिकेचेही खूप कौतुक झाले आहे. याच दरम्यान अभिनेत्याने एक मोठा खुलासा केला आहे. अर्जुन रामपालने नुकताच आपल्या दीर्घकालीन गर्लफ्रंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सशी साखरपुडा केल्याची पुष्टी केली आहे. त्याच्या या खुलाशाने चाहते हैराण झाले आहेत.

अर्जुन रामपालने केला साखरपुडा

अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला नुकतेच रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले. त्यांनी आपल्या लव्ह स्टोरीबद्दलही सर्वांसमोर वक्तव्य केले. गॅब्रिएलाने तर हेही सांगितले की अद्याप त्यांचे लग्न झालेले नाही. अर्जुनने यावेळी म्हटले की, आम्ही तुमच्या शोमध्ये हा खुलासा करत आहोत की आम्ही साखरपुडा केला आहे.

गॅब्रिएलाच्या हॉटनेसने अर्जुनला केले वेडे

याच संभाषणात गॅब्रिएलाने सांगितले की तिने अर्जुनला त्याच्या लुक्ससाठी कधीही अप्रोच केले नव्हते आणि कदाचित अर्जुननेही तसेच केले असेल. गॅब्रिएलाच्या बोलण्यात अडथळा आणत अर्जुन म्हणाला, “नाही, मी तर यांच्या मागे गेलो कारण त्या हॉट आहेत.” पण नंतर मला समजले की हॉटनेस व्यतिरिक्तही बरेच काही आहे.

पालक होऊन प्रेमाबद्दल बदलली विचारसरणी

आपली बाजू मांडताना अर्जुनची गर्लफ्रंड गॅब्रिएलाने सांगितले की पालकत्वाने प्रेमाबद्दलची त्यांची विचारसरणी पूर्णपणे बदलली आहे. तिने म्हटले की, तुमचे प्रेम कंडिशन्ससह येते, म्हणजे जर ही व्यक्ती असा वागली तरच मी तिला मान्य करेन किंवा प्रेम करेन. पण जेव्हा मूल तुमच्या आयुष्यात येते तेव्हा तुम्ही असे करू शकत नाही.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.