AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रफुल्ल पटेल की सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण? भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ; नवीन अपडेट समोर

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून राजकीय वर्तुळात मोठा पेच निर्माण झाला आहे. पियूष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा दावा केल्याने खळबळ उडाली होती, मात्र पटेलांनी स्वतः यावर स्पष्टीकरण दिले आहे.

प्रफुल्ल पटेल की सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण? भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ; नवीन अपडेट समोर
Praful Patel Sunetra Pawar
| Updated on: Feb 02, 2026 | 11:48 AM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भवितव्याबाबत आणि नेतृत्वाबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. एकीकडे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन प्रशासकीय जबाबदारी स्वीकारली आहे. पण दुसरीकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून दिल्लीपासून गल्लीपर्यंत मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पियूष गोयल यांनी पीटीआयला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी खळबळजनक विधान केले होते. अजित पवार यांच्या पश्चात आता प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत, असा दावा पियूष गोयल यांनी केला होता. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. राष्ट्रवादीचे नेतृत्व आता पवार कुटुंबाकडून प्रफुल पटेलांसारख्या दिल्लीतील अनुभवी नेत्याकडे जाणार आहे का? असा सवालही उपस्थित केला जात होता.

सुनेत्रा वहिनी एक दयाळू आणि सक्षम लोकप्रतिनिधी आहेत. बारामतीमधील जनतेची त्यांनी केलेली सेवा मी पाहिली आहे. त्या उपमुख्यमंत्री म्हणून उत्तम काम करतील, याची मला खात्री आहे. आम्ही माझे मित्र अजित दादांना खूप मिस करू. ते एक महान प्रशासक, लोकांचे नेते आणि महाराष्ट्राच्या जनतेचे लाडके होते. त्यांच्या निधनाने निश्चितच एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मी त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो आणि सुनेत्रा वहिनी यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो. राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व अजित पवार यांच्याकडे होतं. आता प्रफुल पटेल यांची राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. शरद पवार यांनी लोकांचा विश्वास गमावला आहे, असे विधान पियुष गोयल यांनी केले होते.

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

पियुष गोयल यांचे विधान वाऱ्यासारखे पसरताच प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः पुढे येत या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यांनी ट्वीटवर एक ट्वीट करत याबद्दलची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या नियुक्तीबाबतच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही निर्णय हा लोकशाही पद्धतीने घेतला जातो. आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करूनच अध्यक्षपदाचा निर्णय होईल. पक्ष सध्या कठीण काळातून जात असून सामूहिक नेतृत्वावर आमचा विश्वास आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

पियूष गोयल यांनी मान्य केली चूक

प्रफुल्ल पटेल यांच्या स्पष्टीकरणानंतर पियूष गोयल यांनीही आपली चूक मान्य केली. एका वरिष्ठ पत्रकाराने मला ही माहिती दिली होती, ज्याची शहानिशा न करता मीभाष्य केले. माझ्याकडून चुकीची माहिती दिली गेली, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार यांच्याच नेतृत्वाखाली काम करत आहे, असे स्पष्टीकरण देत त्यांनी वादावर पडदा टाकला.

राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा तिढा अद्याप कायम

दरम्यान अजित पवारांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांमध्ये भावनाप्रधान वातावरण आहे. पवार कुटुंबाकडेच पक्षाची धुरा राहावी, अशी भावना अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्यातरी सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद गेल्याने त्या पक्षाचा चेहरा असतील, हे स्पष्ट होत असले तरी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं