AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमृता फडणवीस यांना कोणता खाद्यपदार्थ आवडतो? संगीताबाबत स्वप्न काय? खुद्द त्यांनीच सगळं सांगितलं!

मी सकाळी उठल्यानंतर ध्यानकार्य करते. दिवसभर काय करायचे आहे ते ठरवते .योगा महत्वाचा आहे तो केला पाहिजे. मला जिलेबी आणि रबडी खायला भरपूर आवडते. मी आरोग्याकडे दुर्लक्ष करत नाही, अशी माहिती अमृता फडणवीस यांनी दिली.

अमृता फडणवीस यांना कोणता खाद्यपदार्थ आवडतो? संगीताबाबत स्वप्न काय? खुद्द त्यांनीच सगळं सांगितलं!
DEVENDRA FADNAVIS AND AMRUTA FADNAVISImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 04, 2026 | 9:11 PM
Share
Amruta Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमात त्या उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. त्यांना गायनाचीही आवड आहे. दरम्यान पुण्यात एका मुलाखतीत बोलताना अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांची काम करण्याची पद्धत, घरातील वातावरण यावर भाष्य केलं. तसंच त्यांनी उपस्थितांना आरोग्याबाबत एक महत्त्वाचा सल्ला दिला. त्यांनी  आपली दिनचर्यादेखील सांगितली.

…मग व्यायाम करायला का विसरतो

मी सकाळी उठल्यानंतर ध्यानकार्य करते. दिवसभर काय करायचे आहे ते ठरवते .योगा महत्वाचा आहे तो केला पाहिजे.
मला जिलेबी आणि रबडी खायला भरपूर आवडते. मी आरोग्याकडे दुर्लक्ष करत नाही, अशी माहिती अमृता फडणवीस यांनी दिली. तसेच आपण खायला विसरत नाही मग व्यायाम करायला का विसरतो. व्यायाम केल्याने आपले आरोग्य चांगले राहते. स्त्री हेल्थी राहिली तरच फॅमिली हेल्थी राहील, असा सल्लाही त्यांनी महिलांना दिला. मला कधीच पाठदुखी किंवा मानदुखी नाही झाली. तुम्ही सातत्याने शारीरिक व्यायाम करा. फिट इंडिया हे धेय्य साध्य करण्यासाठी व्यायाम करा, असंही त्या म्हणाल्या.

आपल्या देशात गरीब मुलाना संधी मिळत नाही

 
मला चांगले संगीत लोकांच्या समोर आणायचे आहे. मी माझ्या मैत्रीणाच्या घरी गेले होते. तिथे एक मुलगी मला पाणी घेऊन आली. तिने माझ्यासोबत फोटो काढला तसेच मला गाणे ऐकून दाखवले. आपल्या देशात गरीब मुलाना संधी मिळत नाही, अशी खंत व्यक्त करत त्यांनी संगीतापासून लहान मुलांना दूर ठेवू नये, असे आवाहन अमृता फडणवीस यांनी पालकांना केले.

देवेंद्र फडणवीस हे कर्तव्यनिष्ठ मुख्यमंत्री

 
आज मुलं ग्राऊंडवर खेळत नाहीत. मला बँकेत काम करून खूप अनुभव मिळाला. मी काही सामजिक कामं करत आहे, असं सांगत पुढे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस हे कर्तव्यनिष्ठ मुख्यमंत्री आहेत. त्यांनी लोकसेवेत स्वतःला झोकून दिलं आहे. त्याच्याविषयी आदर आहे, अशी भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

घरात फक्त प्रेमाचा पक्ष

मला इमोशनल आणि रोमँटिक सॉंग आवडतात. मला देवी स्रोत आवडते, अशी आवड अमृता फडणवीस यांनी सांगितली. घरात फक्त प्रेमाचा पक्ष असतो घरात अन्य कुठलाही पक्ष नसतो. मी जास्त वेळ मुलीला देत असते. मला घर आवडते, हे सांगायलाही अमृता फडणवीस विसारल्या नाहीत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी