AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच पाहिजे… अमृता फडणवीस पुन्हा बोलल्या

Amruta Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार आणि महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार असं बोललं जात आहे. यावर आता अमृता फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच पाहिजे... अमृता फडणवीस पुन्हा बोलल्या
Amruta Fadnavis on Devendra FadnavisImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 04, 2026 | 8:19 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार आणि महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार असं बोललं जात आहे. खासकरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस हे शिक्षण खात्याची जबाबदारी स्वीकारणार असल्याचंही बोललं जात आहे. मात्र भाजपकडून यावर अद्याप अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार नाहीत अशी माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

देवेंद्रजी महाराष्ट्रातच हवेत

पुण्यात अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का याबाबत प्रश्न विचारला होता. यावर बोलताना अमृता फडणवीस यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांचे चुलते यांनी देवेंद्र भविष्यात देशाचे पंतप्रधान होतील असे वक्तव्य केले होते. या संदर्भात त्यांचे अनेक हितचिंतक आहेत पण मी महाराष्ट्राची मुलगी असल्यामुळे देवेंद्र महाराष्ट्रातच हवेत.’ त्यामुळे अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार नसल्याचे विधान केले आहे.

सुनेत्रा पवारांवरील विधानावरही भाष्य

काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केला आहे. याबाबत अमृता फडणवीस यांचा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना त्यांनी म्हटले की, ‘काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या बद्दल गुंगी गुडिया अशी टीका केली त्याबद्दल त्यांना माफी मागावी.’ आता काँग्रेस माफी मागणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांचेही सुनेत्रा पवार यांच्या विधानावर भाष्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांना काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला होता. यावर बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत. मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही. त्यांना कुणी विचारत नाही. त्यामुळे बातमीत येण्यासाठी अशा पद्धतीचं विधान केलं जात आहे. बदनाम हुये तो हुये, नाम तो हुआ अशा पद्धतीने यांची कार्यवाही सुरू आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पहायला मिळत आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी