AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकवेळ मी ताटाखालच्या मांजरसारखा वाटू शकतो पण… गुंगी गुडिया उल्लेखावर झिरवाळ हे काय बोलून गेले?

ताईंना जर गुंगी गुडिया म्हणत असतील तर ते चुकीचे आहे. मी एकतर गावठी माणूस आहे. मी काँग्रेसच्या लोकांना काहीही बोलून जाईल. पूर्वी इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया म्हटले गेले होते, असे नरहरी झिरवळ म्हणाले.

एकवेळ मी ताटाखालच्या मांजरसारखा वाटू शकतो पण... गुंगी गुडिया उल्लेखावर झिरवाळ हे काय बोलून गेले?
sunetra pawar and narhari zirwalImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 04, 2026 | 8:40 PM
Share

Sunetra Pawar : काँग्रेसने गुंगी गुडिया म्हणत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली. सुनेत्रा पवार यांनी स्वत:कडे राज्याचं अर्थखातं घ्यावं आणि आपण गुंगी गुडिया नसल्याचं सिद्ध करावं, असं आव्हानच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलंय. काँग्रेसच्या गुंगी गुडिया उल्लेखानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. काँग्रेसने याबाबत माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही सत्ताधारी पक्षाकडून केली जातेय. दरम्यान, आता याच प्रकरणावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिलीय. एक वेळी मी ताटाखालच्या मांजरासारखा वाटू शकतो पण सुनेत्रा ताई तशा नाहीत, असं नरहरी झिरवाळ म्हणाले.

पूर्वी इंदिरा गांधी यांना…

ताईंना जर गुंगी गुडिया म्हणत असतील तर ते चुकीचे आहे. मी एकतर गावठी माणूस आहे. मी काँग्रेसच्या लोकांना काहीही बोलून जाईल. पूर्वी इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया म्हटले गेले होते. पण आपण आज क्षणोक्षणी त्यांची आठवण करत असतो. ताईंच्या घरात राजकारण आणि माहेरमध्येही राजकारण आहे. एक दिवस नक्की येईल जेव्हा इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे आपण सुनेत्रा ताईंना पाहू, असं मत झिरवाळ यांनी व्यक्त केलं.

एकवेळ मी ताटाखालच्या मांजरसारखा वाटू शकतो..

सुनेत्रा पवार या गुंगी गुडिया तर आहेतच. पण भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे हाल होत आहेत. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची कोणतीही फाईल क्लियर होत नाही. त्यांच्या विभागाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लक्ष देत नाहीत. अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष नरेंद्र मोदी, अमित शाहा यांच्या ताटाखालचे मांजर झाले आहे, अशी घणाघाती टीका कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. यावरही झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिवसेंदिवस वाढ होत आहे. एखाद्याला भेटायला जाणं म्हणजे ताटाखालचं मांजर होणं नसतं. एकवेळ मी ताटाखालच्या मांजरसारखा वाटू शकतो. पण सुनेत्रा ताई नाहीत, असा प्रत्युत्तर झिरवाळ यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना दिलं.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी