Sanjay Gaikwad : उद्धव ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत… संजय गायकवाड यांचा खोचक टोला
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, त्यांच्यामुळे राजकीय वातावरण तापत नसल्याचे म्हटले. तसेच, त्यांनी जयंत पाटील यांच्या विधानावर, नगरविकास खात्यातील कथित भ्रष्टाचारावर, पार्थ पवार प्रकरणावर आणि बिबट्याच्या वाढत्या दहशतीवर आपले मत स्पष्ट केले.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर परखड भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्यासंदर्भात विचारले असता, “उद्धव ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापू शकत नाही, तर थंडीत काय तापणार आहे?” असा उपरोधिक सवाल संजय गायकवाड यांनी केला. मुख्यमंत्री असतानाही ठाकरे अधिवेशनात केवळ एकदाच हजेरी लावत असत, असेही संजय गायकवाड यांनी नमूद केले. महाविकास आघाडीसोबत युती करण्याच्या ठाकरेंच्या इच्छेवर त्यांनी महायुतीला कोणाचीही गरज नसल्याचे स्पष्ट केले, कारण त्यांच्याकडे २३६ आमदार असल्याचा दावा संजय गायकवाड यांनी केला. महाविकास आघाडीसोबत जाऊ नये म्हणूनच ५० आमदारांनी उठाव केल्याचेही संजय गायकवाड यांनी सांगितले.
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...

