रंग, रूप नाही तर पुरूषांना आकर्षित करते स्त्रियांची ही गोष्ट, का होतो हा केमिकल लोचा?

Scent And Human Attraction: केवळ रंग आणि रूपामुळेच स्त्री अथवा पुरूष एकमेकांकडे आकर्षित होतात असे नाही. तर त्यामागे एक अनाकलनीय कारण आहे. हे कारण ऐकून तुम्हाला ही आश्चर्याचा धक्का बसेल.

रंग, रूप नाही तर पुरूषांना आकर्षित करते स्त्रियांची ही गोष्ट, का होतो हा केमिकल लोचा?
रंग, रूप नाही तर पुरूषांना आकर्षित करते स्त्रियांची ही गोष्ट
| Updated on: Nov 12, 2026 | 1:42 PM

Women Sweat Attraction: पुरूष स्त्रीयांच्या केवळ रंग रूपावर भाळतो असे नाही. तर तिचा गुणी स्वभाव, बुद्धीचातुर्यही नातेसंबंध टिकवण्यासाठी उपयोगी ठरते. पण या पलिकडेही सुद्धा एक असे कारण आहे की, त्यामुळे पुरूष स्त्रीयांकडे आकर्षित होतात. मानवी शरीरातील अदृश्य रासायनिक घटक केमोसिग्नल्स एकमेकांकडे आकर्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. महिलांच्या शरीराचा गंध, घामाचा वास पुरूषांना आकर्षित करतो, असे सांगितले तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. पण शास्त्रज्ञांच्या मते घामातील काही रासायनिक घटकांमुळे हे आकर्षण वाढते.

काय सांगते संशोधन?

Loading...

काही शास्त्रीय अहवालानुसार, मानवी शरीरातून काही घटक द्रव्य घामाच्या वाटे बाहेर पडतात. घामात शरीराचा एक नैसर्गिक गंध असतो. प्राण्यांमध्ये फेरमोन महत्त्वाची भूमिका बजावते. तर मानवी गंध एकमेकांना आकर्षित करण्यासाठी पुरेसा ठरतो. महिलांच्या शारीरिक गंधामुळे पुरूष आकर्षित होतो. भावनात्मक पातळीवर त्याचा परिणाम होतो. एक खास सुंगध पुरूषाला स्त्रीयांमध्ये गुंतवून ठेवतो. तिची ओढ लावतो. तिच्याविषयीचे आकर्षण वाढवतो.

केमोसिग्नल्सची महत्त्वाची भूमिका

दोन व्यक्तीमधील संवादानंतर ते एकमेकांच्या जवळ येतात. आवडती व्यक्ती जेव्हा जवळ येते तेव्हा रासायनिक सिग्नल मेंदूतील विशिष्ट भागांना उत्तेजित करतात. त्या व्यक्तीविषयी आवड निर्माण करतात. त्यावेळी व्यक्तीचा रंग, रूप या कल्पना गळून पडतात आणि जैविक पातळीवर त्या व्यक्तीशी आपोआप जवळीकता वाढते. मानवी शरीराचा गंध पुरूषांना आकर्षित करतो आणि तो त्या स्त्रीच्या प्रेमात पडतो.

संशोधनातून काय आले समोर?

psychologytoday च्या अहवालानुसार, जेव्हा पुरूषांना वेगवेगळ्या परिस्थितीत महिलांच्या घामांचा वास घेण्यास सांगण्यात आले. तेव्हा भावनिक असताना जो गंध होता, तो अधिक आकर्षक वाटल्याचे मत समोर आले. या गंधामुळे महिलेशी भावनिक नाते अजून घट्ट होत असल्याचे मत पुरूषांनी व्यक्त केले. गंधाचे हे गणित समजण्यासाठी तीन वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. यावेळी तरूणांना इतर काही गंध देण्यात आला. पण महिलांच्या एका विशिष्ट गंधांचे त्यांना अधिक आकर्षण असल्याचे संशोधनातून समोर आले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us