AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अश्लिल चित्रपटांसाठीचं जगातलं पहिलं विद्यापीठ, दरवर्षी अ‌ॅडमिशनसाठी झुंबड, प्रशिक्षणासोबतच येथे काय काय होतं ?

या युनिव्हर्सिटीमध्ये पॉर्नमध्ये काम कसे करावे ? त्यासाठी अभिनय कसा करावा ? याविषयी सगळी माहिती देण्यात येते.

अश्लिल चित्रपटांसाठीचं जगातलं पहिलं विद्यापीठ, दरवर्षी अ‌ॅडमिशनसाठी झुंबड, प्रशिक्षणासोबतच येथे काय काय होतं ?
ROCCO SIFFREDI
| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 11:12 PM
Share

मुंबई : पॉर्नोग्राफिक कन्टेंट प्रदर्शित केल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर पॉर्न व्हिडीओ पब्लिश केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या घटनेनंतर शिल्पा शेट्टी यांनी त्यांच्या पतीवरील सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच राज कुंद्रा जे कन्टेंट तयार करायचे ते पॉर्न नसून ते फक्त इरॉटिक व्हिडीओ आहेत, असा दावा शिल्पा शेट्टीने केला आहे. याच प्रकरणावरुन पॉर्न आणि पॉर्नसंबधीच्या इतर बाबींची सध्या चर्चा होत आहे. (know all about world first adult Video star training university in Hungary run by adult video star Rocco Siffredi amid Raj Kundra case)

पॉर्नची दुनिया दिसते त्यापेक्षा खूप मोठी

जगात अनेक देशात पॉर्न इंडस्ट्रीला कायदेशीर मान्यता आहे. या देशांत पॉर्न कन्टेंट तयार करणे तसेच ते प्रदर्शित करण्यावर कोणतेही बंधन नाही. जगात जेवढ्या प्रमाणात पॉर्न तयार केले जाते त्यापेक्षा कित्येक पटीने ते पाहिले जाते. त्यामुळे पॉर्नचे विश्व दिसते त्यापेक्षा खूप मोठे आहे. या जगात पॉर्न फिल्ममध्ये काम करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देणारी एक युनिव्हर्सिटी आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये पॉर्नमध्ये काम कसे करावे ? त्यासाठी अभिनय कसा करावा ? याविषयी सगळी माहिती देण्यात येते. ही युनिव्हर्सिटी रोको सिफरेदी (Rocco Siffredi) चालवतात. या युनिव्हर्सिटीचे नाव सिफरेदी हार्ड अकॅडमी (Siffredi Hard Academy) असे आहे.

2015 मध्ये सुरु करण्यात आली युनिव्हर्सिटी

रोको सिफरेदी (Rocco Siffredi) यांचं नाव तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल. मात्र सहा वर्षांपूर्वी 2015 मध्ये त्यांनी सिफरेदी हार्ड अकॅडमी नावाची युनिव्हर्सिटी स्थापन करण्याची घोषणा केली होती. या युनिव्हर्सिटीमध्ये पॉर्नमध्ये काम करणाऱ्या तरुण-तरुणींना प्रशिक्षण दिले जाते.

जगातील पहिली पॉर्न युनीव्हर्सिटी !

रोको सिफरेदी यांनी जगातील पहिल्या पॉर्न युनिव्हर्सिटीची स्थापना केली. 2015 मध्ये ही युनिव्हर्सिटी स्थापन केल्यानंतर येथे अ‌ॅडमिशन घेण्यासाठी तरुण-तरुणींची झुंबड उडाली होती. या विद्यापीठात पॉर्नसंबधी सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. सिफरेदी हेसुद्धा एकेकाळी मोठे पॉर्नस्टार होते. त्यांनी आतापर्यंत 1600 पॉर्न फिल्ममध्ये काम केलेले आहे. त्यामुळे पॉर्न इंडस्ट्रीमधील कामाचा त्यांना चांगलाच अनुभव आहे.

चेहऱ्यावरील हावभाव, प्रत्यक्ष लैंगिक संबंध, तसेच चित्रिकरणाची दिली जाते माहिती

या युनिव्हर्सिटीमध्ये पॉर्नबद्दलचे सर्व प्रशिक्षण दिले जाते. सेक्च्युअल पोझिशनिंग (Sexual Positioning), चेहऱ्यावरील हावभाव, प्रत्यक्ष लैंगिक संबंध, तसेच चित्रिकरणादरम्यान, पुरुष आणि महिला पॉर्नस्टारमधील केमिस्ट्री अशा सर्व गोष्टी या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवल्या जातात. तसेच पॉर्न शुट करताना महत्त्वाच्या संवादाविषयीसुद्धा येथे माहिती दिली जाते.

कॅमेऱ्यासमोर कसे वागावे याबद्दल मार्गदर्शन

सिफरेदी यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये काय केलं जातं याबद्दल independent.co.uk या वेबसाईटवर अधिक माहिती देण्यात आली आहे. या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार सिफरेदी यांच्या युनीव्हर्सिटीमध्ये अडल्ट सीन कसे शुट केले जातात याबद्दल प्रत्यक्ष माहिती दिली जाते. तसेच या सिनबद्दल प्रशिक्षणही दिले जाते. पॉर्नमध्ये काम करणाऱ्या महिला किंवा पुरषाला कॅमेऱ्याला कसे सामोरे जायचे याबद्दलही येथे सांगितले जाते. हे सर्व प्रशिक्षण रोको सिफरेदी स्वत: देतात.

युनिव्हर्सिटीला पूर्वी चांगलाच विरोध झाला

दरम्यान, युरोपीयन देशातील हंरेगीमध्ये Csömör, Rét street येथे रोको सिफरेदी यांची ही सिफरेदी हार्ड अकॅडमी नावाची पॉर्न ट्रेनिंग युनिव्हर्सिटी आहे. या युनिव्हर्सिटीला पूर्वी चांगलाच विरोध झाला होता.(https://www.roccosiffrediacademy.com/en/) या वेबसाईटवर सिफरेदी यांच्या युनिव्हर्सिटीबद्दल अधिक माहिती मिळू शकेल.

इतर बातम्या :

Raj Kundra Case | अभिनेत्री शर्लिन चोप्राला गुन्हे शाखेकडून समन्स, अश्लील चित्रपट प्रकरणात चौकशी होणार!

एव्हढी लफडी केलीस, मला कळूही दिलं नाही, राज कुंद्राला झापताना शिल्पा शेट्टी ढसाढसा रडली

Raj Kundra Case | राज कुंद्राच्या अटकेनंतरही नव्या शुटिंगची तयारी, शिल्पा शेट्टीची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता!

(know all about world first adult Video star training university in Hungary run by adult video star Rocco Siffredi amid Raj Kundra case)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.