एव्हढी लफडी केलीस, मला कळूही दिलं नाही, राज कुंद्राला झापताना शिल्पा शेट्टी ढसाढसा रडली

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा नवरा राज कुंद्रा (Raj Kundra) हे सध्या खूप चर्चेत आहेत. अलीकडेच राजला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अश्लील चित्रपट प्रकरणात अटक केली आहे.

एव्हढी लफडी केलीस, मला कळूही दिलं नाही, राज कुंद्राला झापताना शिल्पा शेट्टी ढसाढसा रडली
राज-शिल्पा
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 7:44 PM

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा नवरा राज कुंद्रा (Raj Kundra) हे सध्या खूप चर्चेत आहेत. अलीकडेच राजला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अश्लील चित्रपट प्रकरणात अटक केली आहे. राज कुंद्रा यांना 23 जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता, त्यानंतर कोर्टाने त्यांचा रिमांड 27 जुलैपर्यंत वाढवला आहे. दरम्यान, पोलिसांनी शिल्पा शेट्टी यांच्या घराची झडतीही घेतली होती. जेथे राज कुंद्रा देखील टीमसह घरी पोहोचला होता.

मीडिया रिपोर्टनुसार शिल्पा शेट्टी यांची तिच्या घरी गुन्हे शाखेने सखील चौकशी केली. जिथे शिल्पा आणि राज एकमेकांच्या शेजारी बसले होते. दरम्यान, शिल्पा आणि राज यांच्यात जोरदार वादाचे वृत्तही ऐरणीवर आले आहे.

फ्री प्रेस जनरलच्या वृत्तानुसार यावेळी शिल्पा शेट्टी यांचे राज कुंद्राशी बरेच वाद झाले. राजला संपूर्ण पोलीस पथकासह तेथे आणले गेले होते. घरात पोलीस आणि राज यांना पाहून शिल्पा शेट्टी पूर्णपणे हादरली होती. शिल्पा शेट्टी यांच्याशी पोलिसांनी सखोल चौकशी केली असता असे म्हटले जाते आहे की, त्यावेळी अभिनेत्री आपला जबाब देतांना सुद्धा रडली. शिल्पाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणाशी आणि अ‍ॅपशी तिचा काही संबंध नाही. तिचा नवरा असा अॅप बनवत आहे, हे देखील तिला माहित नव्हते.

कर्मचारी बनले साक्षीदार!

अशा परिस्थितीत आता राज कुंद्राच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. राज यांच्या कार्यालयात काम करणारे काही कर्मचारी राज यांच्या विरोधात या प्रकरणात पोलीस साक्षीदार बनले आहेत, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. ज्यामुळे पोलिसांचे हे प्रकरण आता अधिक दृढ झाले आहे.

राज कुंद्रा सध्या तुरूंगात आहे. पोलीस हे प्रकरण आणखी ठोस बनवण्यात गुंतले आहेत. ज्यामुळे पोलीस या प्रकरणात सातत्याने आणि वेगाने काम करत आहेत. कोर्टाच्या पुढील तारखेपूर्वी पोलिसांना हे प्रकरण आणखी सोडवायचे आहे, जेणेकरुन या प्रकरणात आरोपीला शिक्षा होईल.

सिक्रेट कपाटात रहस्ये लपवली!

राज कुंद्रा यांच्या कार्यालयाच्या भिंतीमध्ये एक गुप्त कपाट लपवले आहे, असे वियान इंडस्ट्रीतील एका कर्मचाऱ्याने शनिवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला सांगितले. यानंतर पोर्नोग्राफी प्रकरणात नवीन छापा टाकण्यात आला आहे. छापा टाकल्यानंतर केलेल्या तपासात ते रहस्यमयी कपाट पोलिसांना सापडले आहे. छापा टाकल्यानंतर पोलिसांनी कपाट व काही बॉक्स ताब्यात घेतले आहेत. अश्लील चित्रपटांच्या या व्यवसायाशी संबंधित महत्त्वाचे पुरावे या कपाटातून सापडले आहेत.

(Clashes between Raj Kundra And Shilpa Shetty during police enquiry actress cried in front of police)

हेही वाचा :

राज कुंद्रा प्रकरणात अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटातील अभिनेत्रीचे नाव, आपला यात काहीच संबंध नसल्याचा फ्लोराचा दावा!

Raj Kundra Case | राज कुंद्राच्या अटकेनंतरही नव्या शुटिंगची तयारी, शिल्पा शेट्टीची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता!

Non Stop LIVE Update
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.