राज कुंद्रा प्रकरणात अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटातील अभिनेत्रीचे नाव, आपला यात काहीच संबंध नसल्याचा फ्लोराचा दावा!

अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी' चित्रपटात झळकलेली अभिनेत्री फ्लोरा सैनीचे नावही राज कुंद्रा प्रकरणाशी जोडले जात आहे. आता या प्रकरणात फ्लोरा सैनीने (Flora Saini) आपले मौन सोडले आहे.

राज कुंद्रा प्रकरणात अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटातील अभिनेत्रीचे नाव, आपला यात काहीच संबंध नसल्याचा फ्लोराचा दावा!
फ्लोरा सैनी
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jul 26, 2021 | 1:48 PM

मुंबई : अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटात झळकलेली अभिनेत्री फ्लोरा सैनीचे नावही राज कुंद्रा प्रकरणाशी जोडले जात आहे. आता या प्रकरणात फ्लोरा सैनीने (Flora Saini) आपले मौन सोडले आहे. राज कुंद्राला ती कधीही भेटली नाही किंवा त्याच्याशी बोललीही नाही आणि अनावश्यकपणे तिचे नाव या प्रकरणात ओढले जात असल्याचे फ्लोरा सांगते. शनिवारी एका वृत्तवाहिनीने काही व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे दावा केला होता की, फ्लोरा राज कुंद्राच्या संपर्कात आहे.

या मेसेजेसच्या आधारे, असा दावा केला गेला होता की उमेश कामत आणि राज कुंद्रा त्यांच्या नवीन अ‍ॅप बॉलिफेमच्या एका गाण्यासाठी फ्लोराला साईन करण्याविषयी बोलत आहेत. न्यूज पोर्टलच्या या दाव्यांनंतर फ्लोराने तत्काळ तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला, ज्यामध्ये तिने या वृत्तांचा खंडन करत म्हटले आहे की, अभिनेत्रीला कास्ट करण्याविषयी उमेश कामत आणि राज कुंद्रा यांच्या चॅटमध्ये तिचा काही संबंध नाही आणि याबद्दल तिला काहीच कल्पना नाही.

राज कुंद्राशी कधीही संवाद झाला नाही!

त्याचवेळी बॉम्बे टाईम्सच्या वृत्तानुसार फ्लोरा सैनी म्हणाली की, मी राज कुंद्राशी कधीही बोलले नाही. म्हणूनच मी माझं म्हणण मांडत आहे. मी गप्प बसले तर लोकांना वाटेल की, माझ्याकडे काहीतरी लपवण्यासारखे आहे. चॅटमध्ये दोन लोक माझ्या नावाची चर्चा करत असतील तर याचा अर्थ असा नाही की, मला त्याबद्दल माहिती आहे. गप्पांमध्ये इतर नावांचा उल्लेखही केला गेला होता, बहुदा बोल्ड सीन करणार्‍या अभिनेत्री. मी फिल्मी कुटुंबातील नसल्यामुळे माझे नाव मला विचारल्याशिवाय या प्रकरणात ओढणे योग्य नाही. पॉर्न स्कँडलमध्ये एखाद्या महिलेचे नाव घेण्यात या लोकांना काय मिळते?

फ्लोरा पुढे म्हणाली की, मी फक्त एक वेब सीरिज केली आहे, ज्याचे नाव गंदी बात आहे आणि त्यामध्ये बोल्ड दृश्ये होती. तथापि, स्त्री, लक्ष्मी आणि बेगम जान या चित्रपटांमधील माझे काम लोक विसरले आहेत. म्हणूनच माझे नाव या विवादात ओढले जात आहे, परंतु यामुळे माझी प्रतिमा खराब होऊ शकत नाही. तसेच फ्लोराने सांगितले की, तिला राजच्या हॉटशॉट्सची ऑफर मिळाली होती. तिला सांगण्यात आले होते की, एक वेब सीरीज तयार केली जात आहे, ज्यासाठी त्याने साफ नकार दिला होता.

(Laxmii fame actress Flora saini said she never interacted with raj kundra)

हेही वाचा :

Raj Kundra Case : उमेश कामतच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्समधून खुलासा, गेहना वसिष्ठचं फक्त ‘हॉटशॉट’च नाही तर ‘हॉटहिट’ मध्येही काम

Raj Kundra Case : पूनम पांडे, सागरिका शोनानंतर आता ‘या’ मॉडेलचे गंभीर आरोप, म्हणाली, न्यूड फोटोशूटसाठी मोठ्या रकमेची ऑफर होती

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें