कॅलेंडरमध्ये एका वर्षात 12 महिने, परंतु फेब्रुवारीत का येतात 28 दिवस? जाणून थक्क व्हाल!

| Updated on: Jan 31, 2022 | 5:14 PM

आपल्या प्रत्येकाच्या घरी कॅलेंडर असते, त्या कॅलेंडरमध्ये वर्षात 12 महिने दाखवलेले असतात या प्रत्येक महिन्यामध्ये 30 किंवा 31 दिवस असतात परंतु फेब्रुवारी महिना असा आहे ज्यामध्ये फक्त आपल्याला 28 किंवा 29 दिवस पाहायला मिळतात.चला तर मग जाणून घेऊया यामागे नेमके कारण काय आहे,? कारण जाणाल तर व्हाल थक्क..

कॅलेंडरमध्ये एका वर्षात 12 महिने, परंतु फेब्रुवारीत का येतात 28 दिवस? जाणून थक्क व्हाल!
Follow us on

फेब्रुवारी महिना वर्षातील सर्वात छोटा महिना असतो ज्यामध्ये फक्त 28 व 29 दिवस असतात. आज वर्षातील पहिल्या महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून फेब्रुवारी (February Month) महिना सुरू होणार आहे. फेब्रुवारी महिना हा वर्षातील सर्वात छोटा महिना आहे ज्यामध्ये फक्त 28 व 29 दिवस असतात. जेव्हाही फेब्रुवारी महिना येतो ( February Calendar) तेव्हा प्रत्येक जण या महिन्या बद्दल चर्चा करत असतो आणि तुम्ही कधी विचार केला आहे का? शेवटी असं काय कारण आहे ज्यामुळे आपल्याला फेब्रुवारी महिन्यात (February Month Story) कमी दिवस मिळतात. बाकी अन्य महिन्यांमध्ये 30 किंवा 31 दिवस असतात परंतु फेब्रुवारी महिन्याची कहाणीच काही वेगळी आहे..

तसे पाहायला गेले तर फेब्रुवारी महिन्यामध्ये कधी 28 तर कधी 29 दिवस येतात परंतु तुम्हाला माहिती आहे का यामागे विशेष असे कारण आहे, ज्या कारणामुळे फेब्रुवारीमध्ये आपल्याला कमी दिवस पाहायला मिळतात. चला तर मग जाणून घेऊया या बद्दल, यामुळे फेब्रुवारीचा महिना सर्वात छोटा असतो आणि वर्षातील अन्य 11 महिन्यांवर याचा कोणताच फरक आपल्याला पाहायला मिळत नाही.

फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असण्यामागे आहे “हे” कारण

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, आपली पृथ्वी सूर्याला संपूर्ण फेरी मारण्यासाठी 365 दिवस आणि सहा तास लावते आणि म्हणूनच प्रत्येक चार वर्षानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये एक दिवस वाढवून याचे संतुलन ठेवले जाते, या वर्षाला लीप ईयर असे म्हटले जाते. या सर्व गोष्टी पृथ्वी सूर्याला कशा पर्यंत प्रकारे फेरी मारते यावर अवलंबून असते आणि बाकी अन्य महिने किंवा 31 दिवसाचे असून सुद्धा फेब्रुवारी महिना ॲडजस्ट करण्यासाठी फक्त 28 दिवस आणि काही तासच असतात म्हणून अशावेळी या महिन्याला ॲडजस्ट केले जाते गेले या कारणामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये फक्त 28 दिवस असतात आणि चार वर्षानंतर 29 दिवस येतात.

फेब्रुवारी महिन्यातच का केले जातात दिवस एडजस्ट ?

आता अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न उपस्थित होतो की फक्त फेब्रुवारी महिन्याच्या दिवसांमध्येच का दिवस एडजस्ट केले जातात. हे मार्च ,जानेवारी किंवा डिसेंबर महिन्याच्या बाबतीत का घडत नाही. फेब्रुवारी महिन्यात दिवस ऍडजेस्ट करण्यामागे सुद्धा विशिष्ट असे कारण आहे. सुरवातीला एका वर्षांमध्ये फक्त दहा महिने असायचे व वर्षाची सुरुवात मार्च महिन्यात व्हायची. त्याचबरोबर आता प्रमाणे तेव्हा ही वर्षाचा शेवट डिसेंबर महिन्यानेच व्हायचा. डिसेंबर नंतर ते मार्च महिना यायचा. त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने जोडले गेले. वर्ष 153 BC मध्ये जानेवारी महिन्याची सुरुवात केली गेली परंतु या आधी 1 मार्च पासून वर्षाचा पहिल्या दिवसाची सुरुवात व्हायची..

त्याचबरोबर आधी वर्ष हा 10महिन्याचा असायचा तेव्हा महिन्याचे दिवस वर – खाली व्हायचे.जेव्हा मग नंतर वर्षांमध्ये दोन महिने जोडले गेले तेव्हा दिवसांना देखील त्याच पद्धतीने विभागले गेले अन् यामुळे फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस आले आणि 4 वर्षाच्या हिशोबानुसार 29 दिवस येऊ लागले तेव्हापासून ही परंपरा चालत आली त्याआधी सुद्धा कॅलेंडर मध्ये अनेक बदल करण्यात आले होते.

जर एक दिवस वाढवला नाही तर काय झाले असते?

असे मानले जाते की,जर फेब्रुवारी महिन्यातील एक दिवस वाढवला नाही तर आपण प्रत्येक वर्षाच्या कॅलेंडर प्रमाणे 6 तास पुढे जाऊ, ज्यामुळे ऋतु आणि महिने यांचा ताळमेळ लावण्यास अवघड झाले असते.जर असे नाही केले तर संपूर्ण ऋतु चक्रच बिघडले असते जसे की मे ते जून महिन्यात उन्हाळा न येता तो 500 वर्षानंतर डिसेंबर महिन्यात आला असता.आपणास सांगू इच्छितो की, हिवाळा संपल्यावर व मार्च सुरू होण्यापूर्वी रोमन येथे एक फेस्टिवल साजरा केला जातो,ज्याचे नाव फ़ब्रुआ असे आहे. या फेस्टिवल मध्ये ज्या महिलांना मुलं बाळ होत नाही त्यांना मारपीट केली जाते.

इतर बातम्या-

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! भलंमोठं झाड कारवर पडलं, आश्चर्यकारकरीत्या चालक बचावला

Dombivali Banner : डोंबिवलीतील ‘तो’ मनसेचा बॅनर ठरतोय लक्षवेधी, शिवसेनेला केले टिकेचे लक्ष्य