Banana: केळी वाकडीच का असते? रोज केळी खाणाऱ्यांनाही नाही सांगता येणार

Mystery Shape of Banana: केळी कुणाला आवडत नाही? केळी हा अनेकांचा विक पॉईंट आहे. केळी खाल्याने पोटा साफ होतेच पण शक्तीही मिळते. पण केळी नेहमी वाकडीच का असतात? अर्धगोलच का असतात? केळीच्या फणीत एकदम सरळ केळ कधीतरी दिसते, काय आहे यामागील कारण?

Banana: केळी वाकडीच का असते? रोज केळी खाणाऱ्यांनाही नाही सांगता येणार
| Updated on: Jul 05, 2026 | 4:24 PM

Mystery Curve Shape of Banana: केळी प्रत्येकाला आवडते. पण केळीच्या फणीतील एकही केळ कधीच सरळ का नसते? काही फळं गोल असतात. विविध आकारातील असतात. केळी मात्र अर्धगोलाकार असते. अर्थात हा काही योगायोग नाही. त्यामागे एक खास कारण आहे. रोज केळी खाणाऱ्यांना ही ते माहिती नाही. केळी खरेदी करताना ठिपके असलेली, पिकलेली केळी खरेदी केली जाते. तिच्या वाकड्या आकाराकडे फारसे कुणाचे लक्ष जात नाही. त्यामागे एक कारण आहे.

सफरचंद, संत्रे, टरबूज, खरबूज सारखे फळ हे गोल असतात. काही फळं गोलाकार, अंडाकृती असतात. पण केळ हे नेहमी अर्ध वक्री, अर्धगोल, वाकडे असते. एका खास कारणामुळे केळीला हा आकार येतो. निसर्गातील हा एक चमत्कार म्हणा अथवा या फळाची ती गरज आहे. त्यामुळे केळी ही वक्री दिसतात.

काय आहे कारण?

सुरुवातीला केळी ही सरळ असतात. पण सूर्य किरणांच्या दिशेने ती वाढतात आणि वक्री होतात. त्यांचा आकार वाकडा होतो. अर्धगोलकाराच्या जवळपास जातो. या प्रक्रियेला फोटोटोपिज्म असे म्हणतात. म्हणजे प्रकाशाच्या दिशेने वाढ होणे. केळी नेहमी सूर्य किरणाच्या दिशेने वाढतात. त्यांना तसा आकार येतो. ती अर्ध वक्री होतात. सूर्याच्या दिशेने वाढ होत असल्याने असा आकार येतो.

एकदम अजब निसर्ग घटना

केळीचा झाडाला केळीच घड लटकतात. सुरुवातीला केळी सरळ जमिनीच्या दिशेनेच असते. या घडांनी केळीचे झाडही वाकते. या घडांना केळीच्या अनेक फण्या लटकलेल्या असतात. केळी छोटी असताना त्या सरळ असतात. पण जेव्हा केळी मोठी होते. तेव्हा घडातील फणी आणि त्याला लटकलेली केळं ही सूर्याच्या दिशेने वाढतात. त्यांचा आकार बदलू लागतो. सूर्याच्या दिशेने झालेला हा प्रवास या केळ्यांचा आकार बदलवतो. म्हणजे घड हे खाली लटकतात. पण केळ मात्र सूर्याच्या दिशेने वाढते. सूर्य प्रकाश पडल्यानंतर त्यांचा आकार बदलतो.

या प्रक्रियेला फोटोट्रोपिज्म असे नाव आहे. या प्रक्रियेत अनेक झाडं, फळ हे सूर्याच्या दिशेने वाढतात. काही सूर्य आल्यावर उमलतात. खुलतात. सूर्यफुल नेहमी सूर्याच्या दिशेने तोंड करून असते. तसाच काहीसा हा प्रकार आहे. घडातील अनेक केळी अशाच प्रकारे वाढतात. लहान असताना ही केळी सरळ असतात. नंतर मोठे होताना त्यांचा आकार अर्ध वक्री होतो.

Follow Us