AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Knowledge: पक्षाचा एक पायाचा योगा! एकाच पायावर इतका वेळ उभा राहतो कसा? कारण वाचून अचंबित व्हाल

One Leg Standing Birds: पावसाळ्यात पाणथळ जागी, धरण क्षेत्रात पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसतात. काही परदेशी पक्षी सुद्धा भ्रमंतीला येतात. धरणाच्या बॅकवॉटर परिसरात या पक्षांची शाळा भरते. पक्षी एकाच पायावर इतका वेळ उभा राहतो कसा? कारण वाचून अचंबित व्हाल.

Knowledge: पक्षाचा एक पायाचा योगा! एकाच पायावर इतका वेळ उभा राहतो कसा? कारण वाचून अचंबित व्हाल
पक्षाचा एक पायाचा योगा!
| Updated on: Jul 05, 2026 | 3:51 PM
Share

One Leg Standing Birds: पावसाळ्यात धरणाच्या काठी विविध पक्षांची शाळा भरते. पाणथळीच्या ठिकाणी पक्ष्यांचे थवे दिसतात. धरणाच्या बॅकवॉटरमध्ये योगा, विविध मुद्रा करणारे पक्षी पाहून मन हरकून जाते. काही पक्षी हे एका पायावर योगा करतात. त्यांची ती मुद्रा मोठी मनमोहक असते. आपण जितके वेळ पाहू, ते एकाच पायावर उभे दिसतात. त्यांच्याकडे हे एका पायावर इतक्या वेळ उभे राहण्याचे कसब येते कुठून? काय आहे त्यामागील शास्त्रीय कारण?

एका पायावर झोपही

फ्लेमिंगो, बगळे आणि इतर काही पक्षी लिलया एका पायावर उभे ठाकतात. त्यांचे हे ध्यान पाहण्यात मन हरकून जाते. बरं हे पक्षी तासन तास केवळ उभेच राहत नाहीत तर कधी कधी झोपही घेतात की काय असा भास होतो. अर्थात ही त्यांची रंगीत तालीम नसते. तर निसर्गानेच त्यांना बहाल केलेली एक अद्भूत शक्ती असते. त्याच जोरावर हे पक्षी एका पायावर कित्येक तास निश्चिल, निश्चिंत उभे राहतात. मनुष्य वा इतर प्राणी इतका वेळ उभे राहण्याची उदाहरण फारच कमी आहेत.

काय आहे यामागील कारणं?

पक्षी तज्ज्ञांच्या मते निसर्गतःच पक्षी एका पायावर उभे राहण्याची किमया साधतात. शरीरातील ऊब कमी होऊ नये, ती टिकून राहावी यासाठी पक्षी अशी मुद्रा वारंवार करतात. पायावर पिसं नसल्याने शरीरातील उष्णता वेगाने निघून जाते. त्यामुळे पाण्यात भक्ष शोधणारे पक्षी एका पायावर उभे राहून ऊबदारपणा टिकवून ठेवतात. त्यांच्या शरीराचे तापमान संतुलित राहते. या योगमुद्रेने ते थकत नाही उलट ताजेतवाने होतात. कारण त्यांच्या शरीरातील ऊर्जेची बचत होते.

तर एका पायावरील या आसनात या पक्षांची ऊर्जा टिकतेच पण त्यांची विश्रांतीही होते. हे पक्षी एका विशिष्ट वेळेनंतर पाय बदल करतात. म्हणजे ज्या पायावर ते उभे आहेत, तो पाय वर घेतात आणि दुसरा पाय खाली ठेवतात. याकृतीतून त्यांची ऊर्जा बचत होते.

शिकारीसाठी युक्ती

फ्लेमिंगो, बगळे हे अनेकदा पाणथळ जागी एका पायावर उभे राहतात. ते अगदी स्तब्ध उभे राहतात. जणू त्यांना समाधी लागल्याचे भासते. ते एखादा पुतळा असल्यासारखे वाटतात. मासे या योगाला भुलतात. मासा जसा टप्प्यात येतो. तसे हे पक्षी त्यांना गट्टम करतात. अर्थात ही कला इतर पक्षांमध्ये नाही. ती महाकठीण आहे. ती काहीच पक्षांमध्ये दिसते.

Follow Us
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय;
Big Breaking | मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक...
दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO.

CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO

इन्स्टाग्रामवरील मैत्रीने आयुष्य उद्धवस्थ, विद्यार्थिनीवर सलग 1 वर्ष चाैघांकडून अत्याचार, पुण्यात खळबळ, व्हिडीओ तयार करत...

इन्स्टाग्रामवरील मैत्रीने आयुष्य उद्धवस्थ, विद्यार्थिनीवर सलग 1 वर्ष चाैघांकडून अत्याचार, पुण्यात खळबळ, व्हिडीओ तयार करत..

भारताच्या राजधानीत आंदोलनाला हिंसक वळण; 118 पोलीस जखमी, 78 आंदोलक ताब्यात, अनेक वाहनांचं नुकसान.

भारताच्या राजधानीत आंदोलनाला हिंसक वळण; 118 पोलीस जखमी, 78 आंदोलक ताब्यात, अनेक वाहनांचं नुकसान

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम.

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला,  4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक.

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला, 4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक