
बाजारात सौदर्य प्रसाधनांचा मोठा खप आहे. परंतू लिपस्टीक वापरताना महिलांनी काळजी घ्यायला हवी. कारण बाजारात अवघ्या ५० ते १०० रुपयांच्या लिपस्टीक कसे तयार करतात त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अशा लिपस्टीकना तयार करण्यासाठी असे रंग आणि सामुग्री वापरली जात असते ते पाहिले तर तुम्ही कधीच स्वस्तातील सौदर्य प्रसाधन घेणार नाहीत. या लिपस्टीकमध्ये धोकादायक केमिकल्स ओठांद्वारे थेट पोटात जाऊन त्वचा आणि आरोग्याची नासधूस करतात. या लिपस्टीकला रंग येण्यासाठी अत्यंत विषारी अशा इंडस्ट्रीयल डाय आणि लेडचा वापर केला जातो हे उघडकीस आले आहे.
अलिकडेच एका व्हायरल इंस्टाग्राम पोस्ट आणि टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीने खळबळ उडवून दिली आहे. या स्वस्तातल्या लिपस्टीक अनहायजेनिक वातावरणात तयार केली जाते. तज्ज्ञांनी सांगितले की या स्वस्तातल्या लिपस्टीकने हार्मोन्स डिसरप्शन, वंध्यत्व, आणि कॅन्सर सारख्या आजारांचा धोका असतो असे उघडकीस आले आहे.
व्हिडीओने खळबळ –
ब्युटी एक्सपर्ट मॅनन व्होरा यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली त्यानंतर हा वाद सुरु झाला. त्यांनी सांगितले की स्वस्त लिपस्टीक्स, खास करुन अनियमित ब्रँड्समध्ये बीपीए (बिस्फेनॉल ए) आणि पॅराबेन्स सारखे हार्मोन- डिसरप्टिंग केमिकल्सचा वापर केलेला असतो. व्हिडीओत दाखवले की कसे हे केमिकल्स दीर्घकाळापर्यंत वापरल्याने एंडोक्राईन सिस्टीम खराब करतात.त्यामुळे थायरॉईड, फर्टीलिटी आणि ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. स्वस्तातल्या उत्पादनात केमिकल्स अधिक असतात. कारण त्यात क्वालिटी कंट्रोल नसतो. एका अभ्यासात आढळले की ५० टक्क्यांहून अधिक कॉस्मेटिक्समध्ये टॉक्सिक केमिकल्स, उदा. वॉटरप्रुफ मस्करा (८२ टक्के ) आणि लाँग लास्टींग लिपस्टीक ( ६२ टक्के ) मध्ये पीएफएएस (फॉरएवर केमिकल्स) केमिकल्स असतात. हे केमिकल त्वचेशिरुन वर्षानू वर्षे रहातात. त्यामुळे किडनी आणि लिव्हरला नुकसान पोहचते.
येथे व्हिडीओ पाहा –
व्हायलर व्हिडीओत छोट्या वर्क शॉप्स मध्ये बिना मास्क आणि हातमोजे न घालता, घाणेरड्या लादीवर मिश्रण तयार केले जाते. रंगासाठी इंडस्ट्रीयल डाय, प्रिजर्वेटिव्सच्या नावाखाली पॅराबेंसचा वापर केला जातो.एका लिपस्टीकमध्ये २० पट अधिक लेड सापडले. जे एफडीएने दिलेल्या मंजूरीपेक्षा अधिक आहे.
लेड एक्सपोजरने हार्मोन्स डिसरप्शन इनफर्टिलिटी आणि न्यूरोलॉजिकल इश्यूज वाढतात. अस्वच्छ वातावरणात निर्मिती केल्याने बॅक्टेरिया पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे तोंडाचे इन्फेक्शन वाढू शकते. भारतात गरीबी प्रचंड असल्याने लोक स्वस्तातल्या लिपस्टीक खरेदी करतात. त्यांना स्वस्तात सुंदर दिसायचे असते. परंतू स्वस्त सौदर्य प्रसाधनाने त्यांचे प्राण धोक्यात सापडले आहेत.