AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नववधूने पहिल्या रात्री ठेवली अनोखी अट, म्हणाली आज स्पर्श नको…नंतर अर्ध्यारात्री घडले आक्रीत

राजस्थानातील अझमेर येथे एका तरुणाचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले, मात्र लग्नाच्या पहिल्या रात्री वधूने अशी अट टाकली की वराला नमते घ्यावे लागले. सकाळी उठल्यानंतर वराला मोठा धक्का बसला...असे काय घडले.

नववधूने पहिल्या रात्री ठेवली अनोखी अट, म्हणाली आज स्पर्श नको...नंतर अर्ध्यारात्री घडले आक्रीत
| Updated on: Sep 30, 2025 | 10:04 PM
Share

राजस्थानच्या अजमेरमध्ये एका तरुणाचे लग्न थाटामाटात संपन्न झाले. त्यानंतर वधू वराच्या घरी आली. सर्व प्रथा आणि परंपरा पूर्ण केल्यानंतर हनीमूनची रात्र आली.तेव्हा वधूने वराला सांगितले आज तू मला स्पर्श करु नको, ही आमच्या खानदानाची परंपरा आहे. साध्या भोळ्या वराने असेल एखादी परंपरा म्हणून लगेच वधूचे मन राखले. परंतू सकाळ झाली तर वधूने मोठा गेम केला. झोपेतून जागे होताच वराचे सर्व स्वप्नभंग झाले. चला तर पाहूयात प्रकरण नेमके काय आहे.

वराचे नाव जितेंद्र असून त्याचे नाते एका दलालाने आग्रा येथील मुलीशी जुळवले. त्या बदल्यात या दलालाने दोन लाखांची मागणी केली होती. वराच्या कुटुंबाने ही रक्कम भरली. त्यानंतर दोघांचा जयपुरात मोठ्या थाटामाटात विवाह झाला. त्यानंतर वधूला जितेंद्र याने आपल्या किशनगड येथील घरी वाजत गाजत आणले.

मधूचंद्राच्या रात्रीची परंपरा

सासरी वधूचे मोठ्या धूमधडाक्यात स्वागत झाले. परंतू असली खेळ तर नंतर सुरु झाला. मधूचंद्राच्या रात्री वधूने वराला सांगितले की तिला पहिल्या रात्री स्पर्श नको असल्याने एकत्र झोपू शकणार नाही. आपल्या कुटुंबाची ही परंपरा असल्याचे तिने सांगितले आणि वराला देखील ते खरे वाटल्याने त्याने लागलीच होकार दिला. त्यानंतर तिने आणखी एका परंपरेचा हवाला देत सांगितले की एक रात्र ती सासूचे दागिनेही परिधान करणार आहे. भोळ्या सासूनेही लागलीच तिचे दागिने तिला घालायला दिले. परंतू रात्रीच मोठा धक्का या सूनेने सासूला दिला.

वधूने केला मोठा गेम

जितेंद्र रात्री पाणी पिण्यास उठला तर त्याला वधूच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला,त्यानंतर जितेंद्र आत गेला तर तेथे कोणी नव्हते. कपाट देखील उघडे होते. त्यातील सर्व दागिनेही गायब होते. जितेंद्रने आरडा ओरड केली. कुटुंबातील अन्य लोक धावत आले.त्यानंतर वधूचा शोध सुरु केला. परंतू ती काही सापडली नाही. तेव्हा त्यांना कळाले की ती पळून गेली.

वधू-दलाल दोन्ही फरार

नंतर रडत रडत वर पोलिस ठाण्यात पोहचला. त्याने वधूच्या विरोधात गुन्हा दाखल केला. कुटुंबाने दुसऱ्या दिवशी मदनगंज पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी त्याची बाजू ऐकून त्यानंतर सविस्तर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणात वधू आणि दलाल दोघांचा शोध सुरु केला आहे. सध्या दोघेही फरार आहेत.

नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.