AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या गावात बकरी पाळण्यास आहे सक्त मनाई, नेमके कारण काय ..?

आजही या गावाच्या संपूर्ण परिसरात कोणताही मेंढपाल राहु शकत नाही, की बकरी पाळू शकत नाही. काय आहे या गावाचे रहस्य...कोणत्या देवीने दिला या गावाला शाप...वाचा....

या गावात बकरी पाळण्यास आहे सक्त मनाई, नेमके कारण काय ..?
| Updated on: Sep 29, 2025 | 9:55 PM
Share

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात एक असे गाव आहे की जेथे बकरी पालन करणारे लोक राहू शकत नाहीत. या छतरपूर जिल्ह्यातील लवकुश नगरात ३०० वर्षांपूर्वी पाल समाजाला गावच्या देवीमातेने शाप दिला होता. ज्यामुळे आजही या गावात पाल समाजाचे कोणीही राहात नाही. लवकुश नगरातील रहिवासी सांगतात की सुमारे ३०० वर्षांपूर्वी जंगलातील डोंगरात एक गुराखी आपल्या बकऱ्यांनी चरण्यासाठी घेऊन गेला होता. त्याला डोंगरात एक छोटे कुंड दिसले. त्या कुंडाला लोक पाण्याने भरु शकत नव्हते. त्याने या कुंडाला नीट स्वच्छ केले आणि सर्वांसमोर त्याने घोषणा केली की तुम्ही लोक या कुंडाला पाण्याने भरु शकत नाही.पण मी या कुंडाला दूधाने भरेन…

गावकऱ्यांनी ही कथा सांगताना सांगितले की या मेंढपाळाने त्याच्या सर्व बकऱ्यांचे दूध या कुंडात टाकले. परंतू काही केल्या कुंड भरेना. त्याने त्याच्या नातेवाईकांच्या बकऱ्या देखील आणल्या आणि दूध कुंडात टाकले. परंतू कुंड काही भरेना. कुंडाचा हा चमत्कार सर्वत्र पसरला. ही चर्चा महाराज हिंदूपत यांच्या कानावरही आली. त्यानंतर राजा स्वत:हे चमत्कारिक कुंड पाहायला गेले. लोकांची या कुंडाबद्दल श्रद्धा निर्माण झाली आणि येते गावच्या मातेचे मंदिर स्थापन्न करण्यात आले. महाराज हिंदूपत यांना या मंदिराला पायऱ्या बनवल्या. येथील वयस्कर सांगतात की डोंगरातील कपारीत एक खड्डा आहे तो ९ इंच खोल आणि ४ इंच रुंद आहे.

इतिहासात मंदिराचा उल्लेख

इतिहासकार डॉ. काशी प्रसाद त्रिपाठी यांनी बुंदेलखंडाचा वृहद इतिहास सांगत स्वप्नात दृष्टांत झाल्याने तत्कालिन पन्ना महाराज हिंदूपत यांनी 1758-76 मध्ये चमत्कारीक कुंडाच्या स्थानी माता बंबरबेनीची निर्मिती केली.

मातेने दिला दृष्टांत

पुजारी बृजेश शर्मा यांनी सांगितले की कुंडात माँ सीता आपल्या कुशीत लव आणि कुश यांना घेताना दिसते. हे तेच चमत्कारिक कुंड आहे. ज्याला पाल समाजाच्या एका व्यक्तीने दूधाने भरण्याचा प्रयत्न केला होता. परंतू त्याच्या गर्विष्ठपणामुळे कुंड भरले नाही. माताने त्याच वेळी राजाच्या स्वप्नात दृष्टात दिला की माझ्या जवळपास किंवा माझ्या परिसरात पाल समाजाचा कोणीही व्यक्ती राहणार नाही. यानंतर येथून पाल समाजाचे लोक विस्थापित होऊ लागले. कारण त्यांना अडचणी येऊ लागल्या.

कायम राहल्याने येतात अडचणी

स्थानिक निवासी जगदीश नामदेव यांनी सांगितले की आजही या गावात कोणीही पाल समाजाचा व्यक्ती कायम स्वरुपी राहू शकत नाही. तसेच बकरीही पाळू शकत नाही. जर राहिला तर त्याला खूप कष्टप्रद जीवन जगावे लागते. त्याचा वंश वाढत नाही. त्यामुळे येथे पाल समाजाचे कोणी राहत नाही.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.