Loksabha election : अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन करु शकतात Voter Card अपडेट, खूप सोपी आहे पद्धत

लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीचं रणशिंग फुंकल्यानंतर आता सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. तुम्हाला देखील तुमच्या मतदार ओळखपत्रात कोणतीही माहिती दुरुस्त करायची असेल तर तुम्ही ती ऑनलाईन करु शकतात. कसे करावे अपडेट जाणून घ्या.

Loksabha election : अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन करु शकतात Voter Card अपडेट, खूप सोपी आहे पद्धत
Follow us
| Updated on: Mar 16, 2024 | 7:03 PM

Voter Card : लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने सात टप्पात निवडणुका घेणार असल्याचं म्हटले आहे. 19 एप्रिल पासून याची सुरुवात होणार असून शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. तर ४ जून रोजी निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. यंदा देशात १.८२ कोटी नवीन मतदार मतदान करणार आहेत. पण जर तुम्हाला निवडणुकीच्या आधी तुमचे मतदार ओळखपत्र अपडेट करायचे असेल तर कसे करावे जाणून घ्या.

मतदार ओळखपत्र हे देखील एक महत्वाचा पुरावा आहे. मतदार ओळखपत्र म्हणून देखील ते वापरतात. त्यामुळेच तुमच्या ओळखपत्रात अचूक माहिती असणे गरजेचे आहे. अनेकदा मतदार ओळखपत्रात नाव, वय किंवा पत्ता चुकीचा असतो. त्यामुळे जर तुम्हाला त्यात दुरुस्ती करायची असेल किंवा कोणती माहिती अपडेट करायची असेल तर कशी करावी याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

आधार कार्ड सारखेच तुम्ही तुमचे मतदार ओळखपत्र देखील अपडेट करू शकता.

  • तुम्हाला तुमच्या मतदार ओळखपत्रातील नाव किंवा पत्ता अपडेट करायचा असेल, तर सर्वात आधी तुम्हाला राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल म्हणजेच NVSP च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • आता तुम्हाला तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक आणि जन्मतारीख टाकावी लागेल.
  • लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुढील चरणात मतदार यादीतील नोंदी सुधारण्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुम्हाला येथे दोन पर्याय मिळतील जे नावात सुधारणा किंवा पत्त्यातील सुधारणा असे असतील.
  • तुम्हाला जे काही तपशील अपडेट करायचे आहेत ते निवडा.
  • आता तुम्हाला पुढील चरणात एक फॉर्म दिला जाईल, तो तुम्हाला भरावा लागेल.
  • फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी, तुम्हाला आवश्यक कागदपत्रे प्रदान करावी लागतील. तुम्ही तुमचे नाव अपडेट केल्यास, तुम्ही यासाठी कागदपत्रे म्हणून आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड वापरू शकता.
  • तुम्ही तुमचा पत्ता अपडेट करत असल्यास, तुम्ही आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, वीज बिल किंवा टेलिफोन बिल वापरू शकता.
  • शेवटच्या चरणांमध्ये, तुम्हाला घोषणापत्र भरावे लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल आणि तुम्हाला त्यासाठी विनंती क्रमांक दिला जाईल.
Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.