Rule Change From 1st December : 1 डिसेंबरला होणार मोठे बदल, खिशाला सोसावी लागणार झळ, या गोष्टी महागणार, पैसा..

Rule Change From 1st December : 1 डिसेंबरपासून अनेक नियमात बदल होणार आहेत. त्यातच याची झळ आपल्या घरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यासोबतच आता 1 तारखेपासून टाटाची कार घेणे महाग होणार आहे.

Rule Change From 1st December : 1 डिसेंबरला होणार मोठे बदल, खिशाला सोसावी लागणार झळ, या गोष्टी महागणार, पैसा..
Rule Change December
| Updated on: Nov 27, 2026 | 8:02 AM

नोव्हेंबरचा महिना संपत आला असून 1 डिसेंबरला अनेक गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत. ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार असून अधिकचे पैसे मोजावी लागणार आहेत. जीएसटी आणि कमोडिटी ट्रेडिंगबाबत नवीन नियम लागू होत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्येही बदल होणार आहेत. दर महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये वाढ होते. आता 1 डिसेंबरलाही गॅसच्या किंमती वाढणार का? किंवा कमी होणार का? याकडे सर्वांच्या नजरा आहेत. कारण एलपीजी गॅसची किंमत वाढली की, थेट त्याचा परिणाम खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या किंमतीवर होतो. शिवाय घराचेही बजेट विस्कळते. मागील काही दिवसांपासून एलपीजी गॅस 19 किलोच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. इराण आणि अमेरिका युद्धापासून एलपीजीच्या किंमती बदलत आहेत.

14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये कोणतेही बदल नाहीत. त्यातच एसबीआयडे क्रेडिट कार्ड महाग उद्यापासून होणार आहे. जर तुम्ही एसबीआयचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर हा तुमच्यासाठी मोठा झटका आहे. नवीन बदलांनुसार, 30000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या वाहतूक व्यवहारांवर आणि 50000 रुपयांपर्यंतच्या इंधन खर्चावर 1 टक्के शुल्क लागणार आहे.

Loading...

जर तुम्ही टाटा मोटर्सची कार किंवा एसयूव्ही (SUV) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. 1 डिसेंबरपासून टाटाच्या वाहनांच्या किंमती वाढणार आहेत. 24 नोव्हेंबरचा टाटाकडून याबाबतची घोषणा करण्यात आली. 1 डिसेंबर 2026 पासून सेबीचे मार्जिन नियम बदलत आहेत. परिणामी आता व्यापाऱ्यांना वस्तूंच्या किमतींमधील चढ-उतारांच्या आधारावर इनिशियल मार्जिन राखणे आवश्यक असेल.

हा देखील एक मोठा बदल हा करण्यात आला. पाचवा मोठा बदल हा जीएसटी संदर्भात आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्सने सेंट्रल जीएसटी नियम 2017 मध्ये सुधारणा केली असून 25 नोव्हेंबर रोजी या बदलांची अधिसूचना जारी केली आहे. हा एक मोठा बदल असणार आहे. 1 डिसेंबरला अनेक गोष्टींच्या भावात आणि नियमात बदल होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us