AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल 2.15 रुपये तर डिझेल प्रति लिटर 1 रुपये! जगात सर्वात स्वस्त इंधन मिळतंय तरी कुठे?

जागतिक ऊर्जा संकटामुळे डिझेलच्या किमती पेट्रोलच्या तुलनेत अधिक वेगाने वाढत आहेत. भारतात तर हे भाव १०० च्या पुढे गेले आहेत. अशातच जगात एका ठिकाणी मात्र हे दर फारच कमी आहेत.

पेट्रोल 2.15 रुपये तर डिझेल प्रति लिटर 1 रुपये! जगात सर्वात स्वस्त इंधन मिळतंय तरी कुठे?
Where in the world can you find the cheapest fuel
| Updated on: Nov 27, 2026 | 8:00 AM
Share

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत असताना जगातील काही देशांमध्ये मात्र हे इंधन अत्यंत कमी दरात उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, काही देशांमध्ये एक लिटर डिझेलची किंमत एक रुपयापेक्षाही कमी आहे. लिबिया, इराण आणि व्हेनेझुएला या देशांमध्ये जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल मिळते. दुसरीकडे, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर याच्या तुलनेत कितीतरी जास्त आहेत. ग्लोबल पेट्रोल प्राइसेस डॉट कॉमच्या आकडेवारीनुसार, लिबियामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर अवघा 2.15 रुपये आहे. इराणमध्ये पेट्रोलसाठी 2.65 रुपये, तर व्हेनेझुएलामध्ये 3.25 रुपये मोजावे लागतात.

डिझेलच्या बाबतीत तर चित्र आणखी आश्चर्यकारक आहे. व्हेनेझुएलामध्ये एक लिटर डिझेलची किंमत केवळ 39 पैसे, तर इराणमध्ये 53 पैसे आहे. म्हणजेच या दोन्ही देशांमध्ये एक रुपयापेक्षाही कमी दरात डिझेल मिळते. लिबियामध्ये डिझेलचा दर प्रति लिटर 2.15 रुपये आहे.

भारतातील सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेलचा विचार केला, तर अंदमान आणि निकोबार बेटांवरील पोर्ट ब्लेअरमध्ये इंधनाचे दर सर्वात कमी आहेत. येथे पेट्रोल 88.66 रुपये, तर डिझेल 84.56 रुपये प्रति लिटर दराने मिळते.

जगात सर्वात महाग पेट्रोल कुठे मिळते?

एका बाजूला काही देशांमध्ये पेट्रोलचे दर अगदी मोजक्या रुपयांमध्ये आहेत, तर दुसरीकडे काही देशांमध्ये वाहनधारकांना पेट्रोलसाठी मोठी किंमत मोजावी लागते. हाँगकाँगमध्ये जगातील सर्वात महाग पेट्रोल मिळते. येथे एक लिटर पेट्रोलसाठी तब्बल 410.75 रुपये खर्च करावे लागतात. या यादीत मलावी दुसऱ्या क्रमांकावर असून, तेथे पेट्रोलचा दर 300.68 रुपये प्रति लिटर आहे. भारतातील सर्वाधिक पेट्रोल दराचा विचार केल्यास आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे पेट्रोलची किंमत 118.34 रुपये प्रति लिटर आहे.

डिझेलही हाँगकाँगमध्ये सर्वात महाग!

पेट्रोलप्रमाणेच डिझेलच्या दरातही हाँगकाँगआघाडीवर आहे. येथे एका लिटर डिझेलसाठी तब्बल 441.63 रुपये मोजावे लागतात. मलावीमध्ये डिझेलचा दर 313.75 रुपये प्रति लिटर आहे. भारतात आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे डिझेल सर्वाधिक महाग असून, त्यासाठी वाहनधारकांना 106.06 रुपये प्रति लिटर खर्च करावे लागतात.

वेगवेगळ्या देशांमध्ये इंधनाच्या किमतीत एवढी तफावत का?

जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एकसारख्या नसण्यामागे अनेक कारणे आहेत. कच्च्या तेलाचे उत्पादन, सरकारी अनुदान, कररचना, आयात-निर्यातीवरील निर्बंध आणि स्थानिक बाजारपेठेतील मागणी या घटकांचा इंधनाच्या दरांवर थेट परिणाम होतो. सामान्यतः तेल उत्पादक आणि तुलनेने कमी उत्पन्न असलेल्या काही देशांमध्ये इंधन स्वस्त मिळते. याउलट, अनेक विकसित देशांमध्ये कर आणि इतर शुल्कांमुळे पेट्रोल-डिझेल महाग असते. मात्र, अमेरिका याला अपवाद आहे. जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असूनही अमेरिकेत पेट्रोलचे दर अनेक विकसित देशांच्या तुलनेत कमी आहेत.

अनेक देशांमध्ये पेट्रोलपेक्षा डिझेल महाग का झाले?

सध्या जागतिक इंधन बाजारात एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळत आहे. अनेक देशांमध्ये डिझेलचे दर पेट्रोलपेक्षा अधिक झाले आहेत. यामागे जागतिक स्तरावरील पुरवठ्यातील अडथळे आणि वाढती मागणी ही प्रमुख कारणे आहेत. नोव्हेंबर 2026 मध्ये जागतिक बाजारपेठेत डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींचे गुणोत्तर 1.129 वर पोहोचले. याचा अर्थ पेट्रोलच्या तुलनेत डिझेल सरासरी 12.9 टक्क्यांनी महाग झाले आहे. जानेवारी 2021 मध्ये हेच प्रमाण 0.912 इतके होते.

रशिया-युक्रेन युद्ध आणि इराण संघर्षाचा परिणाम

रशिया-युक्रेन युद्धाचा फटका: फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाकडून होणाऱ्या डिझेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. युरोपमधील बाजारपेठेत डिझेलची टंचाई निर्माण झाली आणि त्याचे पडसाद जगभर उमटले. नोव्हेंबर 2022 मध्ये डिझेल-पेट्रोलचे गुणोत्तर वाढून 1.097 झाले होते.

इराणमधील संघर्षामुळे पुरवठ्याचे संकट: मार्च 2026 मध्ये इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमधून होणाऱ्या डिझेल पुरवठ्यावर परिणाम झाला. परिणामी, जागतिक बाजारपेठेतील उपलब्धता कमी झाली. मार्चमध्ये 1.059 असलेले डिझेल-पेट्रोल गुणोत्तर ऑक्टोबरमध्ये 1.105 आणि नोव्हेंबरमध्ये 1.129 वर पोहोचले.

कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ-उतार: ब्रेंट क्रूडच्या किमती ऑक्टोबर 2026 मध्ये प्रति बॅरल 108.18 डॉलरपर्यंत गेल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये त्यात घट होऊन किंमत 96 डॉलरवर आली. मात्र, कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतरही डिझेलच्या दरांवरील दबाव कायम राहिला.

डिझेलच्या पुरवठ्यावर अधिक अवलंबित्व

पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांची निर्मिती कच्च्या तेलापासून केली जाते. मात्र, त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाचा प्रकार आणि रिफायनिंगची प्रक्रिया वेगवेगळी असते. मध्य पूर्व, रशिया, कॅनडा आणि लॅटिन अमेरिकेतून मिळणाऱ्या जड प्रकारच्या कच्च्या तेलापासून डिझेलचे उत्पादन अधिक होते. तर अमेरिका, नॉर्थ सी आणि पश्चिम आफ्रिकेतून मिळणाऱ्या हलक्या कच्च्या तेलापासून पेट्रोलचे उत्पादन तुलनेने जास्त होते. त्यामुळे विशिष्ट प्रदेशांमधील पुरवठा विस्कळीत झाल्यास डिझेलच्या उपलब्धतेवर अधिक परिणाम होऊ शकतो.

पेट्रोलपेक्षा डिझेलची मागणी अधिक स्थिर

डिझेल महाग होण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्याचा मोठ्या प्रमाणावर होणारा व्यावसायिक वापर. पेट्रोलचा वापर प्रामुख्याने खासगी कार आणि दुचाकींमध्ये होतो. पेट्रोलचे दर वाढल्यास नागरिक प्रवास कमी करून किंवा पर्यायी वाहतुकीचा वापर करून खर्च कमी करू शकतात. मात्र, डिझेलच्या बाबतीत असे करणे तुलनेने कठीण आहे. ट्रक, मालवाहतूक, शेतीची यंत्रे, औद्योगिक उपकरणे आणि विविध व्यावसायिक कामांसाठी डिझेल अत्यावश्यक आहे. काही देशांमध्ये त्याचा वापर हीटिंगसाठीही केला जातो.

त्यामुळे डिझेलच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला की त्याचा परिणाम केवळ वाहनधारकांपुरता मर्यादित राहत नाही, तर मालवाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रावरही होतो. मागणी कायम असताना पुरवठा कमी झाल्यास डिझेलचे दर पेट्रोलपेक्षा वेगाने वाढू शकतात.

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला