रडण्याची आवड आहे? मग ही नोकरी तुमच्यासाठी! अंत्यसंस्कारात अश्रू ढाळण्यासाठी मिळतोय दर महिने लाखोंमध्ये पगार

तुमच्याकडे काही काम नसेल आणि तुम्ही जर चांगल्या नोकरीच्या शोधात असाल,तर ही नोकरी तुमच्यासाठीच आहे. होय अगदी खरं सांगतोय. ही नोकरी केल्याने तुम्ही दरमहिने लाखोंमध्ये कमाई करू शकता.जाणून घ्या सविस्तर

रडण्याची आवड आहे? मग ही नोकरी तुमच्यासाठी! अंत्यसंस्कारात अश्रू ढाळण्यासाठी मिळतोय दर महिने लाखोंमध्ये पगार
crying job on funeral
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 01, 2026 | 10:12 PM

एखाद्या घरात कुणाचा मृत्यू झाला कि संपूर्ण कुटुबांवर दुखा:चा डोंगर कोसळतो. घरात रडणं,नातेवाईंकांची गर्दी आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू असते. अशा वेळी आपल्या माणसाला गमावरल्याचं दु:ख व्यक्त करण्यासाठी कुणाला वेगळं सांगावं लागत नाही. पण जगात अशी काही ठिकाणं आहेत, जिथे दुसऱ्यांच्या अंत्यसंस्काराला जाऊन रडण्यासाठीही लोकांना पैसे दिले जातात, होय तुम्ही अगदी बरोबर वाचलं, या लोकांना प्रोफेशनल मॉनर्स म्हणजे व्यावसायिक रडणारे म्हटलं जातं.

आता प्रश्न पडला असेल की, दुसऱ्याच्या घरात मृत्यू झाला म्हणून कुणी पैसे घेऊन रडायला कसं काय जाऊ शकतं? पण ही गोष्ट खरी आहे. जगातील काही देशांणमध्ये ही अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. काही ठिकाणी तर अंत्यसंस्कारात मोठ्याने रडणं, दुख : व्यक्त करणं आणि मृत व्यक्तीच्या आठवणी सांगणं यालाही विशेष महत्त्व दिलं जातं.

Loading...

 

नेमकं काय काम करायचं असतं

या कामात सहभागी होणाऱ्या व्यक्तींना अंत्यसंस्कारासाठी बोलावलं जातं. तिथे जाऊन त्या मृत व्यक्तीसाठी रडतात, शोकगीत गातात आणि त्यांच्या आठवणी सांगतात. काही जण तर मृत व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित शोकसंगीतही सादर करतात.

चीनमध्ये आहे या नोकरीची खास परंपरा

चीनच्या काही भागांमध्ये व्यावसायिक रडणाऱ्यांची परंपरा आजही पाहायला मिळते. तिथे त्यांना ‘कुसांगरेन’ असं म्हटलं जातं. अंत्यसंस्काराच्या वेळी हे लोक मोठमोठ्यानो रडतात,शोकगीत गातात आणि मृत व्यक्तीच्या आयुष्यावर बोलतात. काही ठिकाणी मोठा रडण्याचा सोहळा देखील आयोजित केला जातो.

काही वेळा घरातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबीय दुखामुळे सुन्न होतात. काहींना आपलं दु:ख व्यक्त करणंही कठीण जातं. अशा वेळी व्यावसायिक रडणाऱ्यांना बोलावलं जातं. त्यांच्या रडण्यामुळे आणि शोकसंगीतामुळे अंत्यसंस्कराता सहभागी झालेल्या इतरांनाही आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आधार मिळतो.

 

केनियामध्येही आहे अशी अनोखी नोकरी

आफ्रिकेतील केनियाच्या पश्चिम भागातही व्यावसायिक रडणाऱ्यांची परंपरा आहे. विशेषत: लुओ समुदायाच्या अंत्यसंस्कारांमध्ये अशा व्यक्तींना बोलावलं जातं. या लोकांचं काम फक्त रडण्यापूरतं मर्यादित नसतं तर सामूहिक शोक प्रदर्शन करण देखील असतं.

या कामासाठी किती पैसे मिळतात?

या नोकरीचं मानधन प्रत्येक ठिकाणी वेगळं असतं. ते अंत्यसंस्काराचा प्रकार, कामाचा कालावधी आणि संबंधित व्यक्तीच्या अनुभवावर अवलंबून असतं. केनियामधील अशा प्रत्येक व्यावसायिक रडणाऱ्याला 80 अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 7,593 रूपये मिळतात. म्हणजे जर तुम्ही प्रत्येक दिवशी असे रडलात तर त्याची किंमत 2,27,790 पर्यंत जाते.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us