AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक नवरा-बायकोच्या मोबाईल ऐकायला मिळतं हे गाणं, 30 वर्षांपासून सुपरहिट

गोविंदाच्या ‘या’ गाण्याने 90 च्या दशकात घातला होता धुमाकूळ. आजही ऐकताच आठवतात जुने दिवस. चित्रपटाने केली होती कोट्यवधींची कमाई.

प्रत्येक नवरा-बायकोच्या मोबाईल ऐकायला मिळतं हे गाणं, 30 वर्षांपासून सुपरहिट
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 01, 2026 | 10:07 PM
Share

90च्या दशकात अभिनेता गोविंदाच्या चित्रपटांची एक वेगळीच क्रेझ होती. त्याच्या चित्रपटांमध्ये कॉमेडी, रोमान्स आणि धमाल गाण्यांचा सुरेख मेळ पाहायला मिळायचा. ‘हिरो नंबर वन’, ‘कुली नंबर वन’ आणि ‘राजा बाबू’ यांसारख्या चित्रपटांमधील गाणी आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. याच काळात गोविंदाचा ‘साजन चले ससुराल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील एका गाण्याने त्यावेळी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. विशेष म्हणजे, आजही हे गाणे ऐकल्यावर अनेकांना जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.

1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटातील ‘तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो’ हे गाणे आजही अनेकांच्या लक्षात आहे. या गाण्यात गोविंदा, करिश्मा कपूर आणि तब्बू यांची धमाल पाहायला मिळते. पती-पत्नीमधील छोट्या-मोठ्या तक्रारी, रुसवे-फुगवे आणि प्रेमळ भांडणे विनोदी पद्धतीने या गाण्यात दाखवण्यात आली आहेत. गोविंदाचा मस्तीखोर अंदाज आणि करिश्मा-तब्बूसोबतची त्याची धमाल यामुळे हे गाणे विशेष गाजले.

गोविंदा, करिश्मा आणि तब्बूची प्रमुख भूमिका

‘साजन चले ससुराल’ या चित्रपटात गोविंदा, करिश्मा कपूर, तब्बू आणि सतीश कौशिक यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. चित्रपटातील विनोद, कलाकारांचा अभिनय आणि धमाल गाण्यांमुळे त्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.

कमी बजेटमध्ये केली कोट्यवधींची कमाई

मिळालेल्या माहितीनुसार, ‘साजन चले ससुराल’ हा चित्रपट सुमारे 4.25 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटाने जगभरात जवळपास 23.61 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर भारतातील त्याची कमाई सुमारे 13.82 कोटी रुपये होती. त्यामुळे हा चित्रपट गोविंदाच्या कारकिर्दीतील यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला.

सतीश कौशिक यांच्या भूमिकेचीही झाली होती चर्चा

या चित्रपटात दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांनी मुथुस्वामी नावाच्या तबलावादकाची भूमिका साकारली होती. त्यांच्या विनोदी अभिनयाचेही प्रेक्षकांनी कौतुक केले होते. गोविंदाची कॉमेडी, करिश्मा आणि तब्बूची साथ, सतीश कौशिक यांचा अभिनय आणि लक्षात राहणारी गाणी यामुळे ‘साजन चले ससुराल’ हा चित्रपट आजही 90 च्या दशकातील लोकप्रिय चित्रपटांमध्ये गणला जातो.

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती