भारतातील सर्वात छोटी नदी कुठे आहे? इतकी स्वच्छ की बघताच थक्क व्हाल

भारतात अनेक नद्या ह्या त्यांच्या लांबीमुळे आणि स्वच्छतेमुळे ओळखल्या जातात. मात्र, अशी एक नदी जी सर्वात छोटी असून तिच्यामागे एक रंजक कहाणी आहे. कुठे आहे ही नदी?

| Updated on: Oct 27, 2026 | 8:03 PM
1 / 5
भारतात अनेक नद्या त्यांच्या लांबी आणि स्वच्छ पाण्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, भारतात सर्वात छोटी नदी कुठे आहे?  आणि तिची लांबी किती किलोमीटर आहे?  जाणून घेऊयात सविस्तर

भारतात अनेक नद्या त्यांच्या लांबी आणि स्वच्छ पाण्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, भारतात सर्वात छोटी नदी कुठे आहे? आणि तिची लांबी किती किलोमीटर आहे? जाणून घेऊयात सविस्तर

2 / 5

भारतामध्ये सर्वात छोटी नदी म्हणून राजस्थानमधील अरवरी नदीचा अनेकदा उल्लेख केला जातो. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून वाहणारी ही नदी केवळ तिच्या लांबीमुळेच नाही तर लोकसहभागातून झालेल्या जलसंवर्धनाच्या कार्यामुळेही प्रसिद्ध आहे.

3 / 5

या नदीची लांबी सुमारे 45 किलोमीटर असून, तिचे पाणलोट क्षेत्र अंदाजे 492 चौरस किलोमीटर आहे. पुढे सैंथल सागर धरणाच्या खाली अरवरी नदी सरसा नदीला मिळते. त्यानंतर दोन्ही नद्यांच्या प्रवाहातून सावन नदी तयार होते.

4 / 5

1980 च्या दशकात अरवरी नदीचा प्रवाह जवळपास संपुष्टात आला होता. परिसरातील पाण्याची टंचाई गंभीर बनली होती. मात्र, तरुण भारत संघ या संस्थेने आणि स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन जलसंवर्धनाचे प्रयत्न सुरू केले.

5 / 5

गावागावांत जोहड म्हणजेच पारंपरिक जलसाठे आणि लहान बंधारे बांधण्यात आले. या प्रयत्नांमुळे भूजलपातळी सुधारण्यास मदत झाली आणि 1995 पर्यंत नदीला वर्षभर पाणी वाहू लागल्याचे सांगितले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us