Snake Facts: मण्यार की नाग? हिवाळ्यात या ठिकाणी लपतात विषारी साप, अशी घ्या काळजी

Krait Cobra Snake Facts: आता हिवाळ्याची चाहुल लागली आहे. माणूसच नाही तर प्राणी सुद्धा थंडीत सुरक्षित जागा शोधतो. थंडी वाजू नये यासाठी उबदार जागा, आडोशाचा प्राणी शोध घेतात. हिवाळ्यात घराच्या जवळपास साप दडून बसू शकतो. त्यामुळे या जागा धोक्याच्या ठरू शकतात. अशी घ्या काळजी.

Snake Facts: मण्यार की नाग? हिवाळ्यात या ठिकाणी लपतात विषारी साप, अशी घ्या काळजी
मण्यार की नाग? हिवाळ्यात या ठिकाणी लपतात विषारी साप
| Updated on: Nov 18, 2026 | 1:46 PM

Krait Cobra Snake Facts: राज्यात थंडीची चाहुल लागली आहे. सकाळी आणि संध्याकाळी थंडीचा कडाका वाढलेला आहे. अशावेळी माणूस असो की प्राणी आडोसा अथवा उबदार जागेचा शोध घेतो. साप हे शीत रक्ताचे असतात. ते स्वतः शरीराचे तापमान नियंत्रित करू शकत नाहीत. त्यामुळे हिवाळ्यात साप उबदार निवाऱ्याच्या शोधात घराच्या जवळपास, अंगणात, बागेत अथवा अडगळीच्या ठिकाणी आश्रय घेतो. अशा जागा या काळात धोक्याच्या ठरू शकतात. यामुळे हिवाळ्यात या जागांमध्ये जाताना थोडी काळजी घेणे फायद्याचे ठरेल.

या ठिकाणी लपतात साप?

Loading...

हिवाळ्याच्या दिवसात साप प्रामुख्याने सुकलेला पालापाचोळा, लाकडांचे ढीग, कोंदट वातावरणातील जागा, दगडांचा ढीग, पडलेले पाईपलाईन, घराबाहेरील बूट, गोणपाट याच्या खाली साप लपून बसतो. दुपारच्या वेळी कोवळ्या उन्हात शरीराला उब मिळण्यासाठी साप बाहेर पडतात. त्यामुळे अडगळीच्या ठिकाणी काम करताना या दिवसात काळजी घेणे गरजेचे आहे.

हे चार विषारी सापामुळे मोठा धोका

भारतात आणि महाराष्ट्रात शेतात काम करताना आणि बसल्या घराच्या आसपास सापाचा मोठा धोका असू शकतो.

नाग: हा अत्यंत विषारी साप आहे. त्याच्या फण्याच्या मागील बाजूस चष्म्यासारखी खूण असते. नागाच्या दंशावर लवकर उपचार न मिळाल्यास मृत्यू होऊ शकतो.

मण्यार: हा साप काळा अथवा निळसर रंगाचा असतो. त्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात. हा साप रात्रीच्या वेळी सक्रिय असतो. तो शांत जागी लपलेला असतो.

घोणस: घोणसच्या अंगावर साखळीसारखे गडद तपकिरी रंगाचे ठिपके असतात. हा साप कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढतो. हा साप क्षणात हल्ला चढवत असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे.

फुरसे: याच्या अंगावर करवतीसारखे खवले असतात. त्याद्वारे तो वेगळा आवाज काढतो. हा साप अत्यंत चपळ असतो. ततो लागलीच हल्ला चढवतो.

काय काळजी घ्यावी?

हिवाळ्यात सर्पदंश टाळण्यासाठी घराचा परिसर आणि अंगण स्वच्छ ठेवा. घराभोवती गवत वाढू देऊ नका. अडगळीचे सामान दूर करा. बाहेर पडताना बूट आणि चप्पल घालण्यापूर्वी नीट तपासून पाहा. रात्रीच्या वेळी अंगणात अथवा शेतात जाताना टॉर्चचा वापर करावा आणि पायात उंच बूट घालावेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us