Donkey: गाढव कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी? पाकिस्तान की… तुमचाही अंदाज चुकणार
Donkey National Animal: पाकिस्तान हा चीनमध्ये सर्वाधिक गाढवं निर्यात करतो. चीनमध्ये गाढवाची मोठी आयात होते. विविध शक्तीवर्धक औषधांसाठी गाढवांचा वापर करण्यात येतो. गाढव हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे?

Donkey National Animal: गाढव हा प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखल्या जातो. गाढवावरून माणसाला उपमा देण्यात येते. पाकिस्तानात गाढव, शेळी, गायी, म्हशींप्रमाणे पाळले जातात. पाकिस्तान चीनमध्ये गाढव निर्यात करतो. तिथे विविध शक्तीवर्धक औषधं, सौंदर्य प्रसाधनांसाठी त्यांचा वापर करण्यात येतो. पण या दोन्ही देशांचा हा राष्ट्रीय प्राणी नाही. अनेक देशांचे सिंह, वाघ, घोडा, मोर असे राष्ट्रीय प्राणी आहेत. काही राज्यांचे पण राष्ट्रीय पशू आणि पक्षी असतात. मग गाढव हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे?
कुठे गाढवाला खास दर्जा?
गाढव हा प्रामाणिक आणि ओझे उचलणारा प्राणी म्हणून ओळखल्या जातो. पण त्याला अनेक देशात कुठलाही अधिकृत दर्जा मिळालेला नाही. पण कॅरिबियन समुद्रातील बोनेरे या सुंदर बेटाने मात्र त्याला खास दर्जा दिला आहे. तो तिथला खास प्राणी आहे. नैसर्गिक पर्यावरण आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेत या प्राण्याला स्थानिकांनी हा विशेष दर्जा दिला आहे.
या बेटावर गाढवांचा वापर वाहतूक आणि सामानाची ने-आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणांवर करण्यात येत होती. आधुनिक वाहनं आल्यानंतर गाढवं जंगलात सोडण्यात आली. त्यामुळे त्यांची संख्या वाढली. त्यानंतर या प्राण्यांच्या संरक्षणासाठी विशेष मोहिम राबवण्यात आली. विशेष म्हणजे या बेटावर गाढवांसाठी जंगल सुरक्षित करण्यात आले आहे. एक प्रकारे हे गाढवांसाठीचे अभयारण्य करण्यात आले आहे.
कॅटालोनियाचे प्रतिक
स्पेनमधील कॅटालोनिया या स्वायत्त प्रदेशात गाढवाला अनौपचारिक प्रतिक म्हणून मान्यता आहे. येथील कॅटलन जातीच्या गाढवाला या प्रदेशाचं अनौपचारिक प्रतिक मानलं जातं. कॅटालोनिया हा स्पेनचा स्वायत्त प्रदेश आहे. गाढव हा काही तिथला राष्ट्रीय प्राणी नाही. पण एक प्रतिक म्हणून स्थानिकांनी गाढवांना ओळख दिली आहे. कॅटलन जातीची गाढवं अतिशय मेहनती आणि काटक स्वभावाची असतात. त्यांच्या मजबूत शरीरयष्टीसाठी ती ओळखली जातात. या गाढवांना या प्रदेशात स्वातंत्र्यांचं प्रतिक मानलं जातं. या प्रदेशात गाढवाच्या प्रामाणिकपणाचा आणि मेहनतीचा आदर करण्यात येतो.