
अभिनेत्री काजल अग्रवालच्या घरी नुकतेच छोट्या चिमुकल्याचे आगमन झाले आहे. काजळ अग्रवालने 19 एप्रिल रोजी मुलाला जन्म दिला. मुलाच्या आगमनानंतर तिच्या कुटुंबात अत्यंत आनंदाचे वातावरण आहे.

काजलच्या मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या मुलाची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. याबरोबरच त्याचे नाव काय ठेवले हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली होती. चाहत्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे

काजल अग्रवालची बहीण निशा अग्रवाल हिने काजलच्या मुलाचे नाव उघड केले आहे. काजल आणि गौतमच्या मुलाचे नाव नील किचलू (NIEL KICHLU ) आहे.

याबरोबरच पॅरेंट क्लबमध्ये सामील झाल्याबद्दल निशाणे बहीण काजल आणि जीजू गौतम यांचे अभिनंदन केले आहे. याबोरोबरच कालची संध्याकाळ संस्मरणीय होती. आमच्या चिमुकल्यचे आम्ही स्वागत करतो. ज्याच्या आगमनामुळे आमचे जग पूर्वीपेक्षा अधिक सुंदर झाले आहे . असे म्हटले आहे .

काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांचे 30 ऑक्टोबर 2020 रोजी लग्न झाले. या लग्नामध्ये केवळ कुटुंबातील सदस्य आणि जवळचे लोक उपस्थित होते.