हर हर महादेव..! अमरनाथ यात्रेला सुरुवात, कसं जायचं? सोबत काय असावं? जाणून घ्या सर्वकाही

अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली असून देशभरातली भाविक मोठ्या श्रद्धेने 'बाबा बर्फानी'च्या दर्शनासाठी जात आहे. हे पवित्र तीर्थक्षेत्रापैकी एक आहे. पण इथपर्यंत प्रवास खूपच कठीण आहे. त्यामुळे तुम्हीही यंदा अमरनाथ यात्रेला जाणार असाल तर काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. चला जाणून घेऊयात याबाबत सविस्तर

हर हर महादेव..! अमरनाथ यात्रेला सुरुवात, कसं जायचं? सोबत काय असावं? जाणून घ्या सर्वकाही
हर हर महादेव..! अमरनाथ यात्रेला सुरुवात, कसं जायचं? सोबत काय असावं? जाणून घ्या सर्वकाही
Image Credit source: फाईल फोटो
| Updated on: Jul 05, 2025 | 5:25 PM

अमरनाथ यात्रेचं हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. जम्मू काश्मीरमधील अमरनाथ गुंफेत दरवर्षी नैसर्गिकरित्या शिवलिंग तयार होतं. याला बाबा बर्फानी नावाने ओळखलं जातं आणि दर्शनासाठी भाविकांची ओढ असते. अनंतनाग जिल्ह्यातील तहसीलमध्ये समुद्रसपाटीपासून 3888 मीटर उंतावर हे ठिकाण आहे. हे शिवलिंग चंद्राच्या कलेप्रमाणे वाढते आणि नंतर कमी होत लुप्त होतं. त्यामुळे या शिवलिंगाबाबत भाविकांची आस्था अधिक दृढ आहे. पौराणिक कथेनुसार, भगवान शिवांनी माता पार्वतीला अमरत्वाचं रहस्य या गुंफेत सांगितली होती ही यात्रा 3 जुलैपासून सुरु झाली आहे आणि 9 ऑगस्टपर्यंत असणार आहे. अतिरेकी हल्ल्याची पार्श्वभूमी पाहता सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. यात्रेचा संपूर्ण मार्ग नो-फ्लाय झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.बाबा अमरनाथांच्या गुहेत पोहोचण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यातील बालटाल येथून सुरू होतो. दुसरा मार्ग अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथून सुरू होतो. ते कोणता मार्ग निवडतात यावर भाविक अवलंबून असतात....

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा