Today gold price : सोन्याच्या भावात मोठे उलटफेर, ट्रम्प यांचा पराभव होताच सराफा बाजारात खळबळ, थेट सोन्याचा भाव..
old Silver Rate Hike : सोन्याच्या भावात मोठे उलटफेर झाले आहेत. अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर थेट सोन्याचे भाव बदलले आहेत. सोन्याच्या भावात तेजी बघायला मिळतंय. दिवाळीत सोने खरेदी करू म्हणण्याऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले.

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावापूर्वी सोन्याचा भाव दोन लाखाच्या आसपास पोहोचला होता. मात्र, युद्धाला सुरूवात झाली आणि सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली. गेल्या काही महिन्यांपासून सोने स्वस्त होत होते. ऐन दिवाळीच्याही तोंडावर सोन्याचे भाव घसरताना दिसले. सोने स्वस्त झाल्याने अनेकांनी सोन्यात गुंतवणूक देखील केली. पुढील काही दिवसात सोने अजून स्वस्त होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, तिथेच खरा मोठा झटका बसला. अमेरिकेत निवडणुका झाल्या. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा दारूण पराभव झाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. यादरम्यानच आता जागतिक बाजारात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण दिसून येत असताना आता अचानक सोन्याच्या भावात तेजी दिसून आली.
अमेरिकेतील निवडणुकीनंतर थेट सराफा बाजारात खळबळ उडाली. थेट सोन्याची घसरण थांबली असून सोन्याच्या भावात तेजी आलीये. 5 नोव्हेंबर 2026 रोजी 24 कॅरेट प्रती 10 ग्रॅम 1,42,810 रूपयांवर पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅम 1,30,910 रूपयांवर पोहोचला आहे. सोन्याच्या भावात तेजी दिसून येत आहे.
मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात चांगलीच घसरण होती. दिवाळीत अजून सोने कोसळणार असल्याचा अंदाज होता. मात्र, आता अचानक सोन्याचे भाव वाढले आहेत. सोने चांगलेच महाग झाले. एका रात्रीत सोन्याच्या भावात मोठा फेरउलट झाला. चांदीच्या भावातही वाढ झाल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या निवडणुकीनंतर कच्च्या तेलाचे भाव घसरताना दिसत आहेत.
इराणच्या युद्धाचा आपल्याला फटका बसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केले. या निवडणुकीनंतर डोनाल्ड ट्रम्प इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यांना या निकालात मोठा धक्का बसला. त्यामुळे आता अमेरिका इराणवर हल्ला करणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अमेरिकेच्या जनतेने डोनाल्ड ट्रम्प यांना या निवडणुकीत नाकारल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिकेतून अनपेक्षित निकाल आल्याचे बोलले जातंय.