कमी गुंतवणुकीत व्हा मालामाल, ‘हे’ आहेत कमाईचे भन्नाट पर्याय

जर तुम्ही नोकरी करत असाल आणि त्यातुनही जर तुमची स्वप्न करोडपती होण्याची असतील म्हणजे अर्थातच आयुष्याची संध्याकाळ सुखकर जावी यासाठी जर तुम्ही काही प्लॅन्स बनवित असाल तर हे पर्याय तुमच्यासाठी अमृताचं काम करतील यात तिळमात्र शंका नाही.

कमी गुंतवणुकीत व्हा मालामाल, 'हे' आहेत कमाईचे भन्नाट पर्याय
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 3:50 PM

जर तुम्ही नोकरी करत असाल आणि त्यातुनही जर तुमची स्वप्न करोडपती होण्याची असतील म्हणजे अर्थातच आयुष्याची संध्याकाळ सुखकर जावी यासाठी जर तुम्ही काही प्लॅन्स बनवित असाल तर हे पर्याय तुमच्यासाठी अमृताचं काम करतील यात तिळमात्र शंका नाही. कारण हे सर्वोत्तम अल्पकालीन गुंतवणूक पर्याय, तुमच्यासाठी हिताचे ठरतील .जर तुम्ही अल्प मुदतीसाठी गुंतवणूक (investment)करण्याचा विचार करत असाल, तर येथे काही सर्वोत्तम अल्पकालीन गुंतवणूक पर्याय आहेत.

तुम्ही यातला एखादा फंड अल्प मुदतीच्या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये पार्क करू शकता, जेणेकरुन रिटर्न रिवॉर्ड मिळवताना तो कधीही निवडला जाऊ शकतो. अगदी तुमच्या रोजच्या चहा, कॉफी, नाष्ट्याच्या पैश्यांमधुनचं तुम्ही हा, मोठा निधी तयार करु शकता. सुरक्षित गुंतवणूक आणि कमी पैशांत जास्तीत जास्त नफा देणाऱ्या असंख्य योजना सध्या बाजारात आहेत. पण यात नेमक्या कुठल्या योजनेमध्ये गुंतवणूक करणं उत्तम आहे, याचीच माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

चला तर मग जाणुन घेऊयात कमी गुंतवणुकीत बक्कळ पैसा मिळवुन देणारे हे अफलातुन आणि सेफ पर्याय.

हे सुद्धा वाचा

१. बँक एफडी अशा अनेक बँका आहेत जिथे मुदत ठेवींवर चांगलं उत्पन्न मिळतं. बर्‍याच बँकांमध्ये आपण मुदत ठेवींवर चांगले उत्पन्न मिळवू शकता. आपली गुंतवणूक ही चलनवाढीच्या दरापेक्षा वेगाने वाढत आहे की नाही हे पाहणं प्रत्येक गुंतवणूकदारासाठी महत्त्वाचं आहे. बँक एफडीमध्ये गुंतवणूक करणं यासाठी चांगलं आहे कारण यामध्ये भांडवल सुरक्षित असतं आणि गुंतवणुकीची पूर्तताही वेळेवर केली जाते. बँक एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरवर्षी ठरलेल्या व्याजानुसार परतावाही मिळतो.

२. लिक्विड फंड तुम्हाला कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी लिक्विड फंड उत्तम पर्याय असू शकतो. हल्लीची तरुणाई या गुंतवणुकीला जास्त पसंती देते. खरंतर, हा एक डेट म्युच्युअल फंड आहे. या फंडामध्ये 91 दिवसांच्या मॅच्युरिटी कालावधीसह उपकरणांमध्ये गुंतवणूक केली जाते. यामध्ये गुंतवणूकदार सहसा 1 दिवस ते 3 महिने गुंतवणूक करू शकतो. उदाहरणार्थ, तुम्हाला मुलांच्या शाळेची फी जमा करण्याआधी तुम्ही ती या फंडमध्ये ठेवू शकता. इतकंच नाही तर जर तुम्हाला दोन महिन्यांनंतर कुटूंबासोबत फिरायला जायचं असेल तर त्याचेही पैसेही तुम्ही या फंडमध्ये गुंतवू शकता. लिक्विड फंड गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे कारण यामध्ये अचानक मोठी रक्कम मिळते. म्हणजेच तुम्हाला मिळालेला बोनस, मालमत्तेची विक्री किंवा कुठल्याही प्रकारे मिळालेलं सेकेंड इन्कम. खरंतर, इक्विटी फंडात गुंतवणूक करणारे बरेच लोक लिक्विड फंडात गुंतवणूक करतात. यानंतर ते हळूहळू एसटीपी (Systematic Investment Plan) च्या माध्यमातून इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये हे पैसे गुंतवतात. या पद्धतीमुळे अधिकच परतावा मिळतो.

३. कॉर्पोरेट एफडी मार्केटमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत जे कामांच्या गरजा भागवण्यासाठी कॉर्पोरेट एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची ऑफर करतात. या कंपन्या एका ठराविक कालावधीसाठी गुंतवणूकदाराकडून भांडवल घेते ज्याला कॉर्पोरेट एफडी असं म्हणतात. यामध्ये चांगलं व्याजदर मिळतं म्हणून गुंतवणूकदार त्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात.

४. पोस्ट ऑफिस डिपॉझिट

लहानग्यांपासून ते वृद्धापर्यंत गुंतवणुकीचे आणि बचतीचे उत्तम पर्याय तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये मिळतात. म्हणजेच काय तर कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करू शकते. इतं वार्षिक व्याज दर दिलं जातं दर तिमाहीची गणनादेखील केली जाते. इथे तुम्ही अगदी कमी पैशात आणि कमी कालावधीसाठीही उत्तम गुंतवणूक करू शकता.

५. रिकर्निंग डिपॉझिट (RD

प्रत्येक महिन्याला थोड्या रक्कमेसह पैसे जमा करणारा हा प्लान एक प्रकारे टर्म डिपॉझिट आहे. यासाठी प्रत्येक बँकेचे वेगवेगळे नियम आहेत. गुंतवणुकीचा हादेखील एक उत्तम पर्याय असल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून आलं. नोकरी किंवा रोजचं इनकम असलेल्या लोकांसाठी बचत करण्याची ही चांगली योजना आहे. यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला तुमच्या पैशांतून बचतीचे पैसे जमा करू शकता आणि यामध्ये व्याज मिळवू शकता. सगळ्यात खास म्हणजे यामध्ये एफडी प्रमाणे व्याजही दिलं जातं.

६. स्वीप-इन FD

समजा तुमच्या एखाद्या बँक खात्यामध्ये पैसे राहिले असतील तर बँक तुम्हाला हे पैसे एफडीमध्ये रुपांतरित करण्याचा पर्याय देते. यालाच स्वीप-इन FD म्हणतात. ही एफडी बचत खात्याशी जोडलेली असते ज्यामध्ये तुम्हाला हवे तेव्हा पैसे काढू शकता.

म्हणजेच जर बचत खात्यामध्ये आवश्यक रकमेपेक्षा जास्त पैसे असतील तर बँक खातेदाराच्या परवानगीने ती रक्कम एफडीमध्ये वळवते. या बचत खात्यातून तुम्हाला अधिक व्याज मिळू शकतं. अनेक बँका तर मुदत ठेवींप्रमाणे व्याज देते.

७. डायरेक्ट इक्विटी

शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे प्रत्येकासाठी सहजसाध्य नसते. कोणता स्टॉक निवडायचा, तो किती काळ ठेवायचा व कधी विकायचा यासाठी अभ्यास असावा लागतो. मात्र दीर्घकाळाचा विचार केल्यास या पर्यायात चांगला परतावा मिळतो. अन्य कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा यातील परतावा अधिक असतो.

८. डेट म्युच्युअल फंड

परताव्यामध्ये स्थैर्य अभिप्रेत असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा पर्याय चांगला ठरतो. या फंडातील रक्कम ही प्रामुख्याने औद्योगिक रोखे, सरकारी रोखे आदींमध्ये गुंतविण्यात येते. यातील एक, तीन व पाच वर्षांच्या योजनांतून अनुक्रमे साडेसहा, आठ व साडेसात टक्के परतावा मिळतो.

९. नॅशनल पेन्शन सिस्टीम

नॅशनल पेन्शन सिस्टीम ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. ती पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटीतर्फे संचलित करण्यात येते. ही योजना म्हणजे इक्विटी, मुदत ठेवी, औद्योगिक रोखे आदींचा मिलाप आहे. या एक, तीन व पाच वर्षांच्या योजनांतून सध्या अनुक्रमे साडेनऊ, साडेआठ व ११ टक्के परतावा मिळत आहे

१०. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड

पीपीएफ ही मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांमधील सर्वाधिक पसंतीची योजना आहे. या योजनेचा कार्यकाळ हा १५ वर्षांचा असतो. या योजनेला सरकारची हमी आहे. यातील व्याज हे चक्रवाढ पद्धतीने मिळते. तसेच, मुदतीअंती मिळणारी रक्कम ही करमुक्त असते.

११. मुदत ठेवी

मध्यमवर्गाचा आणखी एक पसंतीचा पर्याय म्हणजे बँकांतील मुदत ठेवी. एक लाखांपर्यंतच्या मुदत ठेवींना विम्याचे संरक्षण असते. या ठेवी साधारण एक महिन्यापासून पाच वर्षांपर्यंत ठेवता येतात व यातून मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक, वार्षिक पद्धतीने व्याज घेता येते. यातील परतावा कमी असतो, मात्र कमी जोखीम हे याचे वैशिष्ट्य आहे.

१२. सीनियर सिटिझन्स सेव्हिंग्ज स्कीम

ही योजना ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वाधिक पसंतीची असून प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने या योजनेत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तीला टपाल कार्यालय अथवा राष्ट्रीयकृत बँका यांच्या माध्यमातून या योजनेत सहभागी होता येते. या योजनेची मुदत पाच वर्षांची असते व त्यानंतर तीन वर्षांची मुदतवाढ देता येते. या योजनेत किमान १५ लाख रुपये गुंतवता येतात. ८.३ टक्के व्याजाचा परतावा हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. आरबीआय रोखे रिझर्व्ह बँकेचे करपात्र रोखे हाही एक चांगला पर्याय असून त्यातून पावणेआठ टक्के व्याज मिळते. डिमॅट फॉर्मच्या माध्यमातून हे रोखे घ्यावे लागतात.

१३. सोने

हा एक पारंपरिक गुंतवणुकीचा पर्याय आहे. सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक करणे आजही बहुतांश मध्यमवर्गीयांना आवडते. सोन्याच्या मूल्यवृद्धीला यापुढे मर्यादा असल्याने त्यातून मिळणारा परतावा हा कमी- जास्त असण्याची शक्यता आहे. मात्र सोन्याची वस्तु घेताना अनेक प्रकारचे कर, घडणावळ वगेैरे खर्च वाढतात त्यालाच पर्याय म्हणुन डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे यामध्ये आपण अगदी १० रुपयांपासुन सोने खरेदी करु शकतो.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.