नोकरदार ‘या’ 4 ठिकाणी गुंतवणूक करणार, करबचतीसह मोठा नफा मिळणार

गुंतवणुकीसाठी सोने हा देखील चांगला पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग आहेत. जसे की, गोल्ड ईटीएफ, गोल्ड कॉईन्स, सॉवरेन गोल्ड बाँड योजना आहेत. यामध्ये गोल्ड ईटीएफ आणि सॉवरेन गोल्ड स्कीम उत्तम आहे, कारण यामध्ये चोरीची भीती नाही. गुंतवणूकदारांनीही त्यांच्या गुंतवणुकीचा काही भाग सोन्यात गुंतवावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे त्याचा पोर्टफोलिओ संतुलित राहतो.

नोकरदार 'या' 4 ठिकाणी गुंतवणूक करणार, करबचतीसह मोठा नफा मिळणार

नवी दिल्ली : नोकरी सुरू करताच एखाद्या व्यक्तीने आपल्या भविष्यासाठी बचत करायला सुरुवात केली पाहिजे आणि गुंतवणुकीच्या टिप्स दिल्या पाहिजेत. पगार जास्त असो वा कमी, काहीतरी बचत करायलाच हवी. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जिथे तुम्हाला दुहेरी फायदा मिळेल तिथे पैसे गुंतवणे केव्हाही चांगले. म्हणजेच अधिक नफा मिळून कर बचतही करता येते. आम्ही अशाच काही गुंतवणुकीच्या पर्यायांबद्दल सांगत आहोत, जिथे तुम्ही तुमचा पगार गुंतवू शकता.

(1) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF): सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय आहे. हे सुरक्षित गुंतवणुकीसह चांगले व्याज देते. पीपीएफवरील व्याजदर नेहमीच 7 ते 8 टक्के राहिलाय. आर्थिक स्थितीनुसार ते किंचित वाढू किंवा कमी होऊ शकते. सध्या PPF वर व्याजदर 7.1 टक्के आहे, जो वार्षिक चक्रवाढ आहे. PPF सारख्या लहान बचत योजनांवरील व्याजाचे सरकार दर तिमाहीत पुनरावलोकन करते. ईईई श्रेणीमध्ये पीपीएफ गुंतवणूक करमुक्त आहे. मिळालेले व्याजदेखील करमुक्त असेल आणि परिपक्वता रक्कम देखील पूर्णपणे करमुक्त असेल.

(2) सोने: गुंतवणुकीसाठी सोने हा देखील चांगला पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग आहेत. जसे की, गोल्ड ईटीएफ, गोल्ड कॉईन्स, सॉवरेन गोल्ड बाँड योजना आहेत. यामध्ये गोल्ड ईटीएफ आणि सॉवरेन गोल्ड स्कीम उत्तम आहे, कारण यामध्ये चोरीची भीती नाही. गुंतवणूकदारांनीही त्यांच्या गुंतवणुकीचा काही भाग सोन्यात गुंतवावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे त्याचा पोर्टफोलिओ संतुलित राहतो

(3) इक्विटी म्युच्युअल फंड: पगारदार लोकांनी त्यांच्या गुंतवणुकीचा काही भाग म्युच्युअल फंडात गुंतवावा, असे तज्ज्ञ सुचवतात. म्युच्युअल फंडामधील एसआयपीद्वारे इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे चांगले होईल. यामध्ये शेअर बाजारातील तेजीचा फायदा गुंतवणूकदारांना मिळतो. येथे तुम्ही 500 रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक सुरू करू शकता. असे गुंतवणूकदार ज्यांनी नोकरी सुरू केली आहे ते येथे गुंतवणूक करू शकतात. त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

(4) रिकरिंग डिपॉझिट (RD): तुम्ही दर महिन्याला रिकरिंग डिपॉझिट आरडीमध्ये थोडी थोडी गुंतवणूक करू शकता. नियमित बचतीच्या दृष्टीने हा एक चांगला पर्याय आहे. बर्‍याच बँकांची आवर्ती ठेवींमध्ये किमान गुंतवणुकीची मर्यादा 500 रुपये आहे. यामध्ये सर्वांचे व्याजदरही वेगवेगळे आहेत. SBI आवर्ती ठेवीवर 5 ते 5.4 टक्के व्याज मिळत आहे.

संबंधित बातम्या

रेल्वे 1.5 लाख तरुणांना देणार नोकऱ्या, कोणत्या दिवशी RRB NTPC लेव्हल-1 चा निकाल?

Amazon वर Xiaomi flagship days sale सुरु, अनेक दमदार स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची संधी

Published On - 5:04 pm, Wed, 8 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI