AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील 6 देशात लष्कराचा नाही ठावठिकाणा, मग कोण करते सीमांची सुरक्षा

Countries Which Have No Army: प्रत्येक देश लष्करी सामर्थ्य वाढवण्याच्या स्पर्धेत आहे. अनेक देशाचे संरक्षण बजेट कित्येकपट अधिक आहे. शस्त्रास्त्र खरेदीची, नवीन शस्त्रे तयार करण्याची मोठी स्पर्धा लागलेली असताना जगाच्या पाठीवरील या सहा देशात मात्र अजिबात सैन्य, लष्कर नाही. मग कोण करतं या राष्ट्रांच्या सीमांचं संरक्षण?

जगातील 6 देशात लष्कराचा नाही ठावठिकाणा, मग कोण करते सीमांची सुरक्षा
जगातील 6 देशात लष्कराचा नाही ठावठिकाणा
| Updated on: Aug 02, 2026 | 3:49 PM
Share

जगाच्या कानाकोपऱ्यात शेजारील राष्ट्रात कुरबुरी नित्याच्याच आहेत. अनेक देशात सीमा कलह आहे. प्रत्येक देश सैन्य, लष्करी ताकद वाढवत आहे. सीमेवर लष्कर तर देशातंर्गत पोलीस अशी सुरक्षेची दुहेरी व्यवस्था प्रत्येक देशात आहे. संरक्षणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च सुरू आहे. पण जगातील या 6 देशात मात्र लष्कर नाही. त्यांच्याकडे प्रगत, आधुनिक शस्त्रास्त्रे सुद्धा नाहीत. मग या देशांचं संरक्षण कोण करतं? विनालष्कर असलेले ते देश तरी कोणते?

मॉरिशस Mauritius

मॉरीशस हा हिंद महासागरातील एक देश आहे. 13 लाख लोकसंख्या असलेल्या या देशात भारतीय वंशीयांचा वरचष्मा आहे. 1968 मध्ये ब्रिटिशांनी या देशाला स्वातंत्र्य बहाल केले. या देशाकडे स्वत:चे लष्कर नाही. पण देशातंर्गत सुरक्षेसाठी आणि नागरी समस्यांसाठी इथे अर्धसैनिक दल आणि पोलिस यंत्रणा आहे. त्यांना स्पेशल मोबाईल फोर्स म्हणतात. येथे 10,000 पोलिस देशाची बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा सांभाळतात.

मोनॅको – Monaco

हा जगातील सर्वात छोटा देश आहे. भूमध्य समुद्रातील या देशाला टॅक्स हेवन असे म्हटले जाते. इथे करांचं प्रमाण अत्यल्प आहे. या देशात 31,000 नागरिक राहतात. आकाराने हा छोटा देश आहे. या देशाकडे 17 व्या शतकापासून लष्कर नाही. येथे पोलिसांची एक तुकडी आहे. ती राजमहलाची आणि नागरिकांची संरक्षण करते. या देशाचे संरक्षण फ्रान्सचे लष्कर करते.

कोस्टा रिका – Costa Rica

1949 नंतर या देशात कोणतेही लष्कर नाही. पोलीस यंत्रणाच येथील नागरिकांचे संरक्षण करते. मध्य अमेरिकेचे स्वित्झर्लंड म्हणून हा देश ओळखला जातो. 1948 मध्ये इथे मोठे गृहयुद्ध झाले. त्यानंतर येथील लष्कर संपुष्टात आणण्यात आले. देशातंर्गत सुरक्षेसाठी इथे पोलीस दल आहे.

आईसलँड – Iceland

लष्कर नसले तरी आईसलँड हा नाटोचा सदस्य देश आहे. आईसलँड हे युरोपमधील सर्वात मोठे बेट आहे. येथील निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतो. या देशाची सुरक्षा नाटोचे सदस्य देश करतात. 1869 पासून हा देश विना लष्कर म्हणून ओळखला जातो. या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी अमेरिकेकडे आहे.

ग्रेनाडा – Grenada

ग्रेनाडा कॅरेबियन समुद्रातील लेसर एंटिल्स या उत्तरी भागातील एक बेट आहे. 1983 मध्ये ग्रेनाडावर अमेरिकेने हल्ला केला होता. तेव्हापासून इथं लष्कर नाही. रॉयल ग्रेनेडा पोलीस फोर्स नावाचे पोलीस दल आहे. ते अंतर्गत आणि किनारपट्टीची सुरक्षा करते.

सेंट लूसिया – St.Lucia

सेंट लूसिया हे वेस्ट इंडिजजवळील एक द्वीप राष्ट्र आहे. ते कॉमनवेल्थचे सदस्य राष्ट्र आहे. या देशाकडे स्वतःचे सैन्य नाही. येथे किनारपटीच्या सुरक्षेसाठी नौदल आहे. अंतर्गत सुरक्षेसाठी पोलीस दल आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी