मुलाला सैन्यात ऑफिसर बनवायचंय? मग डेहराडूनच्या ‘या’ स्पेशल मिलिटरी स्कूलबद्दल नक्की वाचा!

मुलाच्या भविष्याची चिंता वाटते? त्याला सैन्यात ऑफिसर बनण्याची इच्छा आहे, पण योग्य दिशा सापडत नाहीये? RIMC हे नाव ऐकून असाल, पण खरंच माहिती आहे का की इथे प्रवेश मिळवणं किती आव्हानात्मक आहे आणि त्यातून काय साध्य होतं? यामागे आहे कठोर परिश्रम, प्रचंड स्पर्धा आणि देशाचे भावी नेतृत्व घडवण्याचं एक समर्पित ध्येय! चला, समजून घेऊया RIMC प्रवेशाचं गुपित आणि तुमच्या मुलाच्या खांद्यावर अभिमानाचे स्टार्स पाहण्याचा मार्ग!

मुलाला सैन्यात ऑफिसर बनवायचंय? मग डेहराडूनच्या या स्पेशल मिलिटरी स्कूलबद्दल नक्की वाचा!
| Edited By: | Updated on: Apr 25, 2025 | 3:00 PM

आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल व्हावं, त्याने मोठं काहीतरी करावं, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. जर तुमच्या मुलाला लहान वयातच शिस्त, देशभक्ती आणि लष्कराविषयी आकर्षण असेल, तर त्याच्यासाठी एक खास संधी उपलब्ध आहे, डेहराडूनमध्ये असलेल्या RIMC नावच्या शाळेमध्ये.

ही शाळा केवळ अभ्यास शिकवत नाही, तर आपल्या देशासाठी समर्पित, कणखर आणि कर्तबगार अधिकारी घडवण्याचं काम करते. नुकत्याच जाहीर झालेल्या NDA/NA 2024 परीक्षेत या कॉलेजच्या तब्बल 28 विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवलंय. विशेष म्हणजे, या कॉलेजमधीलच पश्चिम बंगालच्या एमन घोष याने देशात पहिलं क्रमांक (AIR 1) पटकावलं आहे!

RIMC म्हणजे काय?

RIMC म्हणजे ‘राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज’. ही शाळा 1922 साली स्थापन झाली असून आज भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. इथे मुलांना वयाच्या 11.5 ते 18 वर्षांच्या दरम्यान प्रवेश दिला जातो.

इथे केवळ पुस्तकी ज्ञान दिलं जात नाही, तर देशसेवा, शिस्त आणि नेतृत्वगुण यांचं मुळापासून प्रशिक्षण दिलं जातं. इथून शिकलेले विद्यार्थी पुढे भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात अधिकारी म्हणून रुजू होतात.

या कॉलेजचा इतिहास पाहिला तर अभिमान वाटावा असा आहे! भारतातले चार लष्करप्रमुख, दोन हवाई दल प्रमुख, तसेच राजकारण, परराष्ट्र सेवा आणि प्रशासकीय सेवेत कार्यरत अनेक अधिकारी या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत.इतकंच नाही, तर पाकिस्तानसुद्धा याच कॉलेजचे काही माजी विद्यार्थी सैन्यात वरिष्ठ पदांवर आहेत!

RIMC मध्ये प्रवेश कसा मिळतो?

RIMC मध्ये प्रवेश मिळवणं अगदी सोपं नाही, कारण इथे देशभरातून फक्त 25 हुशार विद्यार्थ्यांचीच निवड केली जाते.
दरवर्षी दोनदा — जानेवारी आणि जुलैमध्ये — नवे विद्यार्थी घेतले जातात.

अर्जासाठी पात्रता:

उमेदवाराचं वय 11 ते 13 वर्षांच्या दरम्यान असावं.

सातवीत शिकत असावा किंवा सातवी उत्तीर्ण असावा.

अर्जाची प्रक्रिया:

साध्या शाळांसारखा थेट प्रवेश नसतो. इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्य सरकारमार्फत अर्ज करावा लागतो.

निवड कशी होते?
RIMC मध्ये दोन टप्प्यांमधून निवड केली जाते:

1. लेखी परीक्षा (Total 400 Marks)

इंग्रजी : 125 गुण
गणित : 200 गुण
सामान्य ज्ञान : 75 गुण

2. तोंडी मुलाखत (50 Marks)

लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावलं जातं.

अखेरच्या निकालात लेखी आणि मुलाखतीचे एकत्रित गुण पाहूनच प्रवेश निश्चित होतो.