AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

No shave November: नोव्हेंबर महिन्यात जगभरातील पुरुष दाढी का करत नाही? काय आहे ही मोहीम?

No Shave November: नोव्हेंबर महिन्यात लोक दाढी करत नाही. केसही कापत नाही. त्यातून वाचलेले पैसे 'मॅथ्‍यू हिल फाउंडेशन'ला देतात. मग 'मॅथ्‍यू हिल फाउंडेशन' कॅन्सरसंदर्भात काम करणाऱ्या संस्थांपर्यंत ते पैसे पोहचवते. आता सोशल मीडियामुळे No Shave November हा कॉन्‍सेप्‍ट जगभर पोहचला आहे.

No shave November: नोव्हेंबर महिन्यात जगभरातील पुरुष दाढी का करत नाही? काय आहे ही मोहीम?
No Shave November
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 07, 2024 | 10:19 AM
Share

नोव्हेंबर महिना सुरु होताच जगभरात अनेक पुरुष दाढी करत नाही. या महिन्यात दाढी न करण्याचे कारण पुरुषांना विचारले तर उत्तर मिळते No shave November. जगभरातील पुरुष ‘नो सेव्ह नोव्हेंबर’ का साजरा करतात? त्यामागील कारण काय? याबाबत माहिती अनेकांना नसते. कधी ‘नो सेव्ह नोव्हेंबर’ ही मोहीम सुरु झाली. कोणी ‘नो सेव्ह नोव्हेंबर’ मोहीम सुरु केली, जाणून घेऊ या…

काय आहे ही मोहीम

‘नो सेव्ह नोव्हेंबर’ ही मोहीम कर्करोग (कॅन्सर) रुग्णांसाठी आहे. कॅन्सर विरोधात राबण्यात येणारे जगभरात सुरु असलेले हे कॅम्पेन आहे. कर्करोगासंदर्भात जागृकता निर्माण करणे आणि कर्करुग्णांना मदत करणे, यासाठी 2007 मध्ये अमेरिकेत ही मोहीम सुरु झाली. या मोहिमे दरम्यान दाढी वाढवली जाते. त्याचा उद्देश फक्त दाढी वाढवणे नाही तर कॅन्सरसंदर्भात एकजुटता दाखवणे आहे.

रुग्णांना कशी मिळणार मदत

अभियानामुळे कॅन्सर रुग्णांना कशी मदत मिळणार? हा प्रश्न तुम्हाला पडला आहे. खरंतर या महिन्यात दाढी करण्यावर जो खर्च आपण करतो तो खर्च कॅन्सर रुग्णांसाठी दान केला जातो. त्यामुळे कॅन्सर रुग्णांना उपचारासाठी पैसे मिळतात, तसेच त्या लोकांना तुमच्यासोबत इतर अनेक जण असल्याचा विश्वास मिळतो.

का सुरु झाली ही मोहीम

वर्ष 2007 मध्ये अमेरिकेतील शिकागोमध्ये राहणारे मॅथ्‍यू हिल यांचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या आठ मुलांनी कॅन्सरसंदर्भात जागृकता निर्माण करण्यासाठी कॅम्पेन सुरु केले. सन 2009 त्यांनी ‘मॅथ्‍यू हिल फाउंडेशन’ नावाची संस्‍था बनवली. त्या माध्यमातून कॅन्सरबाबत जगजागृकता आणि कॅन्सर रुग्णांना मदत करणे सुरु केले.

नोव्हेंबर महिन्यात लोक दाढी करत नाही. केसही कापत नाही. त्यातून वाचलेले पैसे ‘मॅथ्‍यू हिल फाउंडेशन’ला देतात. मग ‘मॅथ्‍यू हिल फाउंडेशन’ कॅन्सरसंदर्भात काम करणाऱ्या संस्थांपर्यंत ते पैसे पोहचवते. आता सोशल मीडियामुळे No Shave November हा कॉन्‍सेप्‍ट जगभर पोहचला आहे. परंतु अनेकांना त्याचे खरे कारण माहीत नाही. नोव्हेंबरमध्ये फक्त गंमत म्हणून केस आणि दाढी कापू नका, असे सांगितले जाते.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा