पुढारी झाल्यावरही दिव्या मित्तल यांना मिळणार IAS ची पेन्शन? जाणून घ्या नियम

Divya Mittal IAS Pension : सनदी अधिकारी दिव्या मित्तल यांनी राजीनामा दिला आहे. 13 वर्षांच्या सेवेनंतर त्या राजकारणात उतरत आहेत. त्यांना IAS ची पेन्शन मिळणार का? जाणून घ्या नियम

पुढारी झाल्यावरही दिव्या मित्तल यांना मिळणार IAS ची पेन्शन? जाणून घ्या नियम
दिव्या मित्तल, आयएएस अधिकारी
| Updated on: Sep 30, 2026 | 1:52 PM

उत्तर प्रदेशातील आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी प्रशासकीय सेवेला रामराम ठोकला. आपण राजकारणात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या प्रस्थापित कोणत्याही राजकीय पक्षात त्या जाणार नाहीत. तर स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची योजना त्यांनी आखली आहे. दिव्या मित्तल यांनी 13 वर्षांच्या प्रशासकीय सेवेनंतर 30 ऑगस्ट 2026 रोजी पदाचा राजीनामा दिला. 15 सप्टेंबर रोजी त्याला औपचारिक मंजूरी मिळाली. प्रशासकीय जीवनावर तुळशीपत्र ठेऊन त्यांनी राजकारणाचा मार्ग धरला आहे. पण पुढारी झाल्यावर त्यांना सरकारी पेन्शन मिळेल का? जाणून घ्या नियम

VRS घेतल्यावर मिळते पेन्शन?

Loading...

कायदेशीर आणि प्रशासकीय नियमानुसार, जेव्हा एखादा आयएएस अधिकारी त्याच्या इच्छेनुसार राजीनामा देतो. तेव्हा त्याला जुन्या सेवेच्या आधारे पेन्शनवर दावा सांगता येत नाही. अखिल भारतीय सेवा (मृत्य, सह सेवानिवृत्ती लाभ) नियम, 1958 च्या नियम 5(1) मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, जर स्वतःहून सनदी अधिकाऱ्याने राजीनामा दिला तर, त्याची सेवा शून्य मानली जाईल. याचा अर्थ त्याचा राजीनामा मंजूर होताच त्याच्या सेवेतील सातत्य खंडित होते आणि निवृत्तीवेतन, निवृत्तीविषयक इतर लाभ मिळवण्याचा अधिकार ती व्यक्ती गमावते.

स्वैच्छिक सेवानिवृत्ती आणि राजीनाम्यात काय अंतर

प्रशासकीय सेवेमध्ये राजीनामा आणि स्वैच्छिक सेवानिवृत्तीत (Voluntary Retirement Scheme-VRS) कायदेशीर आणि वैधानिक फरक असतो. VRS अंतर्गत सेवानिवृत्ती मिळायची असेल तर प्रशासकीय अधिकाऱ्याला किमान 20 वर्षे नियमित आणि पात्र सेवा पूर्ण करणे अनिवार्य आहे. 20 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यावर व्हीआरएस घेणाऱ्या अधिकाऱ्याला नियमानुसार, पेन्शन मिळते. दिव्या मित्तल यांनी 13 वर्षांच्या सेवेनंतर आयएएस पदाचा राजीनामा दिला आहे. त्या व्हीआरएसच्या नियमानुसार पेन्शन मिळण्यास पात्र ठरत नाहीत.

उच्च पदस्थ अधिकाऱ्याला मिळणारी पेन्शन

देशातील उच्च पदस्थ सनदी अधिकाऱ्याला, कॅबिनेट सचिव पदावरून निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना सर्वाधिक पेन्शन, निवृत्ती वेतन मिळते. कॅबिनेट सचिवाचा अंतिम मूळ वेतन हे दरमहा 2.5 लाख रुपये इतके निश्चित आहे. त्यानुसार, त्याला निवृत्तीनंतर दरमहा अंदाजे 1.25 लाख रुपये पेन्शन मिळते. त्यात महागाई भत्ता वेगळा दिला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us