
जगभरात लोकसंख्या वेगाने वाढत आहे. विशेषतः इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांची संख्या खूप वेगाने वाढत आहे. मुस्लीम धर्म मानणाऱ्या लोकांची लोकसंख्या ३४.७ कोटीने वाढली आहे. त्यामुळे जगभरात इस्लाम धर्माच्या समर्थकांची संख्या १९४ कोटी ६० लाख झाली आहे. प्यू रिसर्च सेंटरने ही माहिती दिली आहे.
प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालात म्हटले आहे की, मुस्लीम धर्म मानणाऱ्यांची एकूण लोकसंख्या १९४ कोटी ६० लाख झाली आहे. त्यात १.८ टक्के वाढ झाली आहे. जगातील एकूण लोकसंख्यांपैकी २५.६ टक्के लोकसंख्या मुस्लीम धर्म मानणाऱ्यांची आहे. परंतु सध्या जगभरात एका वेगळ्याच धर्माचे वर्चस्व आहे. जगातील १२० देशांमध्ये हा धर्म आहे.
जगभरातील १२० देशांमध्ये ख्रिश्चन धर्माचे वर्चस्व आहे. सन २०२० पर्यंत ख्रिश्चन धर्म मानणाऱ्या लोकांची संख्या १२० देशांमध्ये सर्वाधिक असल्याचे प्यू रिसर्च सेंटरने म्हटले आहे. हा धर्म मानणारे जगभरात आता २.३० बिलियन लोक आहेत. सध्या जगात ख्रिश्चन धर्म मानणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी त्यांची टक्केवारी कमी झाली आहे. यापूर्वी ख्रिश्चन धर्म मानणारे जगभरात एकूण ३०.६ टक्के लोक होते. ती संख्या आता २८.८ वर आली आहे. म्हणजे ख्रिश्चन धर्म मानणाऱ्यांची लोकसंख्या १.८ टक्क्यांनी कमी झाली आहे. यामुळे या धर्म मानणारे लोक येत्या काही वर्षांत आपले पहिले स्थान गमावणार आहे.
एक काळ होता जेव्हा ख्रिश्चन धर्म संपूर्ण जगात प्रबळ होता. युरोपियन वसाहतींमधून ख्रिश्चन धर्म वेगाने पसरला. पण आता तो कमी होत चालला आहे. आता इस्लाम जगात वेगाने पसरत आहे. आता इंग्लंडमध्येही मुस्लीम धर्माची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. अमेरिकेतील अनेक युवक स्वत:ला कोणत्याही धर्माचे मानत नाही. त्यांचे विचार वैज्ञानिकतेकडे झुकणार आहे. तसेच पूर्वी ज्या पद्धतीने ख्रिश्चन मिशनरींकडून धर्मांतर होत होते, आता त्याला अनेक देशांनी कायदेशीर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अनेक देशांमध्ये ख्रिश्चन धर्माचे वर्चस्व कमी होत आहे. इस्लाम धर्माचा विस्ताराचा आताच्या वेगानुसार, सन २०५० पर्यंत ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्म मानणाऱ्यांची संख्या समसमान होणार आहे. जगभरात हिंदूची लोकसंख्या ११५.८ कोटी आहे.