AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Municipal Election 2026 : युती झाली म्हणून नाचले, पेढे वाटेल, नंतर काल अचानक पलटी मारुन भाजपमध्ये प्रवेश, राज ठाकरेंशी दगाबाजी करणारे दिनकर पाटील कोण?

Municipal Election 2026 : राजकारण किती अनिश्चित असतं, याचा काल प्रत्यय आला. इथे कधीही काहीही घडू शकतं. जो नेता ठाकरे बंधु एकत्र आले म्हणून नाचत होता, पेढे वाटत होता, त्याने अचानक मनसे सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला. राज ठाकरेंनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यानेच दगाबाजी केली. हे दिनकर पाटील कोण?

Municipal Election 2026 : युती झाली म्हणून नाचले, पेढे वाटेल, नंतर काल अचानक पलटी मारुन भाजपमध्ये प्रवेश, राज ठाकरेंशी दगाबाजी करणारे दिनकर पाटील कोण?
Dinkar Patil
| Updated on: Dec 26, 2025 | 10:03 AM
Share

राजकारणात कोण कोणाचा कायमस्वरुपी मित्र नसतो, कायमस्वरुपी शत्रू नसतो, राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, या वाक्यांचा शब्दश: अर्थ काल लक्षात आला. बुधवारी मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली म्हणून जो नेता नाचत होता, पेढे वाटत होता. त्याने काल अचानक भाजपमध्ये प्रवेश केला. हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी मोठा धक्का आहे. कारण ज्या नेत्याला राज ठाकरेंनी सर्वकाही दिलं, मान-सन्मान,अधिकार दिले त्याने अशी तडकाफडकी दुसऱ्या पक्षात उडी मारावी, याचा अर्थ राजकारणात विचारधारा, तत्व, निष्ठा आपल्या सोयीनुसार बदलतात हेच दिसून आलं. दिनकर पाटील हे मनसेधील मोठे नेते होते. त्यांचा पूर्व इतिहास हा पक्ष बदलाचा राहिला आहे. विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता.

दिनकर पाटील यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सर्व मान-सन्मान देण्यात आला. अधिकार दिले. त्यांनी मागच्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्यावेळी ऐनवेळी भाजपला सोडचिठ्ठी देऊन मनसेमध्ये प्रवेश केला होता. त्यांना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. दिनकर पाटील हे नाशिकमधील राजकीय महत्वकांक्षा असलेले नेते म्हणून ओळखले जातात. मागच्यावर्षी भाजपकडून लोकसभेच तिकीट मिळवण्यासाठी ते इच्छुक होते. पण त्यावेळी ही जागा शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात आली. तेव्हापासूनच ते भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरु झालेली. विधानसभेला त्यांनी मनसेमध्ये प्रवेश करुन नाशिक पश्चिमची उमेदवारी मिळवली.

अचानक भाजप प्रवेशामागे कारणं काय?

आता ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मनसेमध्ये दिनकर पाटील हे प्रदेश सरचिटणीस होते. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी ते उमेदवारांच्या मुलाखती घेत होते. काल अचानक त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राजकारणातील अनिश्चितता असते ती हीच. नाशिकच्या सातपूर भागात दिनकर पाटील यांचं वर्चस्व आहे. यंदाच्या पालिका निवडणुकीत दिनकर पाटील यांची पत्नी आणि मुलाला तिकीट निश्चित मानलं जात आहे. अचानक भाजप प्रवेशामागे ही सर्व समीकरणं आहेत.

राज ठाकरेंबद्दल काय म्हटलं?

तुम्ही मनसे का सोडताय? मनसेमध्ये तुम्ही कोणावर नाराज आहात का? हा प्रश्न दिनकर पाटील यांना विचारला. त्यावर त्यांनी ‘मी कुठेही नाराज नाही. मी विकासासाठी चाललो आहे’ असं उत्तर दिलं. ‘मी राज साहेबांवर नाराज नाही. मी विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करतोय’ असं उत्तर दिनकर पाटील यांनी दिलं.

दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!.
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ...
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ....
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला.
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध.
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.