राखेच्या ट्रकच्या धडकेत 10 जणांचा मृत्यू, जळगाव अपघातात नेमकं काय झालं?

जिल्ह्यातील यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ रविवारी मध्यरात्री क्रूझर आणि डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.

राखेच्या ट्रकच्या धडकेत 10 जणांचा मृत्यू, जळगाव अपघातात नेमकं काय झालं?
Follow us
| Updated on: Feb 03, 2020 | 11:33 AM

(Jalgaon accident) जळगाव : जिल्ह्यातील यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ रविवारी मध्यरात्री क्रूझर आणि डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील (Jalgaon accident) चिंचोल गावातील चौधरी कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. चौधरी कुटुंबीय मुलीच्या लग्नाचे रिसेप्शन आटोपून घरी परतत असताना, वाटेतच हा अपघात घडल्याने, संपूर्ण जिल्हा हादरला आहे. 

नेमकं काय झालं?

मुक्ताईनगर जिल्ह्यातील चिंचोली येथील चौधरी कुटुंबातील मुलीचा लग्नसोहळा नुकताच पार पडला होता. या सोहळ्यानंतर रविवारी सायंकाळी चोपडा येथे रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. रिसेप्शनाला चौधरी कुटुंबीय तसेच इतर नातेवाईक चोपड्याला गेलेले होते. रिसेप्शन आटोपल्यानंतर चौधरी कुटुंबीय 3 क्रूझर गाड्यांनी चिंचोलकडे परतत होते. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ या 3 गाड्यांपैकी (एम. एच. 19 सी. व्ही. 1772) क्रमांकाच्या क्रूझरला समोरून भरधाव येणाऱ्या (एम. एच. 40 एन. 7758) राख वाहून नेणाऱ्या डंपरने जोरात धडक दिली. त्यात क्रूजरमधील 10 जण ठार झाले तर 7 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

ज्या क्रूझरला डंपरने धडक दिली त्यात महिला आणि लहान मुले होती. अपघाताची माहिती मिळताच यावल तसेच रावेर येथून काहींनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने भुसावळ तसेच जळगाव येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती आहे. दरम्यान, मृतांपैकी 6 जणांवर यावल ग्रामीण रुग्णालयात तर उर्वरित 4 जणांवर जळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन होणार आहे.

अपघातातील मृतांची नावे अशी-

1) मंगलाबाई ज्ञानेश्वर चौधरी (वय 65, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)

2) प्रभाकर उर्फ बाळू नारायण चौधरी (वय 60, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)

3) आश्लेषा उमेश चौधरी (वय 28, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)

4) रिया जितेंद्र चौधरी (वय 14, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)

5) प्रभाबाई प्रभाकर उर्फ बाळू चौधरी (वय 40, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)

6) सोनाली जितेंद्र चौधरी (वय 34, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)

7) प्रियंका नितीन चौधरी (वय 28, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)

8) सोनाली सचिन महाजन (वय 34, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर)

9) सुमनबाई श्रीराम पाटील (वय 55, रा. निंबोल, ता. रावेर)

10) संगीता मुकेश पाटील (वय 40, रा. निंबोल, ता. रावेर)

अपघातातील जखमींची नावे अशी-

1) सर्वेश नितीन चौधरी (वय 9, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)

2) धनराज गंभीर कोळी (वय 35, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)

3) आदिती मुकेश पाटील (वय 14, रा. निंबोल, ता. रावेर)

4) शिवम प्रभाकर चौधरी (वय 15, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)

5) सुनीता राजाराम पाटील (वय 45, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)

6) मीना प्रफुल्ल चौधरी (वय 30, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)

7) मुकुंदा गणेश भंगाळे (वय 25, रा. डांभुर्णी, ता. यावल)

3 गावांवर शोककळा-

या अपघातात एकाच कुटुंबातील 10 जण ठार झाले आहेत. सर्वजण एकमेकांचे नातेवाईक होते. मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल, चांगदेव आणि रावेर तालुक्यातील निंबोल या 3 गावांमधील लोकांचा मृतांमध्ये समावेश आहे. या घटनेनंतर तीनही गावांवर एकच शोककळा पसरली आहे. या अपघातात चिंचोल येथील प्रभाकर उर्फ बाळू नारायण चौधरी यांच्यासह त्यांच्या पत्नी तसेच 2 बहिणींचा मृत्यू झाला आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.