लहान भावंडांसाठी 11 वर्षीय मुलीने तब्बल दीड लाख रुपये चोरले!

लखनऊ : उत्तर प्रदेशातील नोएडा येथे चोरीप्रकरणी 11 वर्षीय मुलीला अटक केली आहे. या मुलीच्या चोरीचं कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. लहान भावंडांसाठी चॉकलेट आणि खेळणी खरेदी करण्यासाठी या अल्पवयीन मुलीने चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. सुमारे दीड लाख रुपयांची चोरी या अल्पवयीन मुलीने केल्याचेही समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, “मुलीचे वडील रिक्षा चालक […]

लहान भावंडांसाठी 11 वर्षीय मुलीने तब्बल दीड लाख रुपये चोरले!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशातील नोएडा येथे चोरीप्रकरणी 11 वर्षीय मुलीला अटक केली आहे. या मुलीच्या चोरीचं कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. लहान भावंडांसाठी चॉकलेट आणि खेळणी खरेदी करण्यासाठी या अल्पवयीन मुलीने चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. सुमारे दीड लाख रुपयांची चोरी या अल्पवयीन मुलीने केल्याचेही समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, “मुलीचे वडील रिक्षा चालक आहेत. चोरीची घटना सोमवारी सदरपूर कॉलनीमध्ये घडली. तक्रारदार राजकुमार शर्मा (27) यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, मी कामानिमित्त बाजूला गेलो होतो. पाच मिनिटात परत येणार असल्याने तळ मजल्यावरील घराचा दरवाजा उघडा ठेवला होता.”

“जेव्हा मी घरी परतलो तर माझ्या चार सोन्याच्या अंगठ्या आणि 65 हजार रुपये गायब होते. गेटजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामधील दृश्य पाहिल्यावर चोरी झाल्याची घटना समोर आली. एक मुलगी घरात घुसली आणि किंमतीच्या वस्तू घेऊन घरातून बाहेर पडताना दिसली. गुरुवारी याच मुलीला मी माझ्या घराजवळ पाहिल्यावर मला सीसीटीव्ही कॅमेरातील मुलीचा चेहरा मिळता जुळता दिसला. मी तातडीने पोलिसांना फोन लावून बोलावून घेतले.”, असे तक्रारदाराने सांगितले.

दरम्यान, मुलीला पोलिसांनी अटक केल्यानंतर तिने चोरीची कबुली दिली. तिने सांगितले की, तिला तिच्या दोन लहान बहीण आणि भावांसाठी चॉकलेट आणि खेळणी खरेदी करायची होती. या दरम्यान त्या मुलीने पोलिसांना सांगितलं की, एका महिलेने तिच्याकडून चोरीच्या सर्व वस्तू घेतल्या, त्या महिलेने तिला घरचा पत्ता दिला होता आणि सर्व सामानाच्या बदल्यात पाचशे रुपये दिले. असं पोलिस अधिकारी उदय प्रताप सिंह यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.