राजसाहेबांचं झंझावाती भाषण झोंबलंय, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, मनसे नेत्याचा राऊतांना इशारा

'राज ठाकरे मौनी खासदारांचं समर्थन करत आहेत. ही त्यांची मजबुरी आहे. राज ठाकरेंचा देव बदलु शकतो', अशी खोचक टीका केली होती. त्यावर मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. अमेय खोपकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलंय बघा व्हिडीओ

राजसाहेबांचं झंझावाती भाषण झोंबलंय, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
| Updated on: May 05, 2024 | 5:22 PM

भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोकणात जाहीर सभा झाली. यासभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. यानंतर विरोधकांनी राज ठाकरेंसह नारायण राणेंवर टीका केली. राज ठाकरेंच्या सभेनंतर आज सकाळी संजय राऊत यांनी ‘राज ठाकरे मौनी खासदारांचं समर्थन करत आहेत. ही त्यांची मजबुरी आहे. राज ठाकरेंचा देव बदलु शकतो’, अशी खोचक टीका केली होती. त्यावर मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. अमेय खोपकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं की, राजसाहेब ठाकरे यांची कणकवलीमधली सभा दणदणीत झाली. राजसाहेबांचं झंझावाती भाषण कसं झोंबलंय ते सकाळच्या रडत राऊतांच्या रडगाण्यावरुन जनतेला कळलंच असेल. विरोधकांना सळो की पळो करणारी राजसाहेबांची शैली या निवडणुकीतला हायलाईट ठरणार हे नक्की’, असा विश्वासही अमेय खोपकर यांनी व्यक्त केला. तर पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असं म्हणत अमेय खोपकर यांनी संजय राऊत यांना इशाराच दिलाय.

Follow us
ही भाषा नको, नेहमी छगन भुजबळांचं का ऐकून घ्यावं? राणेंचा करारा जवाब
ही भाषा नको, नेहमी छगन भुजबळांचं का ऐकून घ्यावं? राणेंचा करारा जवाब.
या निवडणुकीत काय होणार? ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही; दादा काय म्हणाले
या निवडणुकीत काय होणार? ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही; दादा काय म्हणाले.
या नशेडी व्यवस्थेत एका आमदाराचा मुलगा होता, नाना पटोलेंचा रोख कुणावर?
या नशेडी व्यवस्थेत एका आमदाराचा मुलगा होता, नाना पटोलेंचा रोख कुणावर?.
सुप्रिया सुळेंमुळे लोक पक्ष सोडताय, तरुण महिला नेत्याचे गंभीर आरोप
सुप्रिया सुळेंमुळे लोक पक्ष सोडताय, तरुण महिला नेत्याचे गंभीर आरोप.
'ससून'च्या रक्त चाचणी विभागातील एका कर्मचाऱ्यानं ठोकली धूम, कारण...
'ससून'च्या रक्त चाचणी विभागातील एका कर्मचाऱ्यानं ठोकली धूम, कारण....
शिंदे जाणार? राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार?संजय शिरसाटांच उत्तर काय?
शिंदे जाणार? राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार?संजय शिरसाटांच उत्तर काय?.
बापाची जिद्द कायम, इयत्ता 10 वीत 10 वेळा नापास, पण 11 व्या प्रयत्नात..
बापाची जिद्द कायम, इयत्ता 10 वीत 10 वेळा नापास, पण 11 व्या प्रयत्नात...
400 पार की तडीपार? महायुतीला किती जागा? अनिल थत्तेंची भविष्यवाणी काय?
400 पार की तडीपार? महायुतीला किती जागा? अनिल थत्तेंची भविष्यवाणी काय?.
माथेरानला जाण्याच प्लान करताय? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, येत्या ऑगस्ट
माथेरानला जाण्याच प्लान करताय? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, येत्या ऑगस्ट.
रेमलचा मान्सूनवर परिणाम नाही, 'या' तारखेपर्यंत पाऊस महाराष्ट्रात दाखल
रेमलचा मान्सूनवर परिणाम नाही, 'या' तारखेपर्यंत पाऊस महाराष्ट्रात दाखल.