पुण्यात SRPF च्या आणखी 14 जवानांना कोरोनाची लागण

| Updated on: May 27, 2020 | 8:12 AM

पुण्यात काल (26 मे) राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) एकाच कंपनीनीतल 14 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले (Corona Virus infected SRPF Soldier) आहे.

पुण्यात SRPF च्या आणखी 14 जवानांना कोरोनाची लागण
Follow us on

पुणे : पुण्यात काल (26 मे) राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) एकाच कंपनीनीतल 14 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले (Corona Virus infected SRPF Soldier) आहे. तर 33 जवानांचे अहवाल अजून प्रतीक्षेत आहेत. याआधी सहा जवानांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्व जवानांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. संसर्ग झालेल्या जवानांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले (Corona Virus infected SRPF Soldier) आहे.

रामटेकडी येथील एसआरपीएफ क्रमांक दोनची एक कंपनी बंदोबस्तासाठी बाहेरगावी गेली होती. बंदोबस्त पूर्ण केल्यानंतर संबंधित कंपनी 19 मे रोजी पुण्यात आली. त्यानंतर 21 मे रोजी काही जवानांना कोरोनाची लक्षणं दिसू लागली. त्यामुळे या कंपनीतील 20 जवानांच्या घशातील नमुने घेण्यात आले.

नमुने घेतल्यानंतर सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर काल आणखी 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सध्या या सर्व जवानांवर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

नुकतेच मालेगावहून औरंगाबाद परतेलेल्या 67 जवानांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या सर्व जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर हे सर्व जवान कोरोना मुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत अनेक ठिकाणी जवानांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. तर पोलीस कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यंत 1800 पेक्षा अधिक पोलिसांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

संबंधित बातम्या :

मालेगावहून औरंगाबादला परतलेले 67 एसआरपीएफ जवान कोरोनामुक्त

CISF च्या जवानांनी कोरोनाला गाडलं, 6 जवान कोरोनामुक्त, पनवेलमध्ये 10 जणांना डिस्चार्ज