आमीर-माधुरीच्या ‘दिल’चा सिक्वल येणार, नवं नाव काय? स्टारकास्ट कोण?

आमीर-माधुरीच्या 'दिल'चा सिक्वल येणार, नवं नाव काय? स्टारकास्ट कोण?

Aamir Khan and Madhuri Dixit hit film Dil sequel : अभिनेता आमीर खान आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या तुफान गाजलेल्या दिल या सिनेमाचा सीक्वल येणार आहे. 1990 च्या दशकात जबरदस्त गाणी आणि प्रेमकहाणीने दिल सिनेमा हिट झाला होता. या सिनेमाचा सीक्वल येणार असल्याची चर्चा होती. मात्र दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी या चर्चांमध्ये तथ्य असल्याचं सांगितलं. दिल सिनेमाच्या सीक्वलचं नावही दिल हेच राहणार आहे.

दिग्दर्शक इंद्र कुमार यांचा टोटल धमाल हा सिनेमा 22 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान इंद्र कुमार यांनी दिल सिनेमाचा सीक्वल येणार असल्याचं जाहीर केलं. इंद्र कुमार म्हणाले, “आम्ही अनेक वर्षांपासून या सिनेमाचा सीक्वल बनवण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र त्यासाठी चांगल्या स्क्रीप्टची गरज होती. आता स्क्रीप्टवर शिक्कामोर्तब केलं आहे. अन्य गोष्टी लवकरच निश्चित केल्या जातील.”

दरम्यान, ‘दिल’च्या सीक्वल घोषणेनंतर या सिनेमाच्या स्टारकास्टबद्दल उत्सुकता आहे. 1990 मध्ये आलेल्या दिल सिनेमामध्ये माधुरी दीक्षित आणि आमीर खान ही रोमँटिक जोडी पाहायला मिळाली होती. या सिनेमातील गाणी सर्वाधिक गाजली होती.

सध्या या सिनेमातील गाण्यांचं रिमेक व्हर्जन बॉलिवूड गाजवत आहे. इंद्र कुमार यांच्या टोटल धमाल या सिनेमात जुन्या गाण्यांच्या रिमेकचा वापर केला आहे.

Published On - 11:44 am, Tue, 12 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI