एसी लोकलमुळे रेल्वेच्या कमाईत भरघोस वाढ, दोन वर्षात 40 कोटींहून अधिक कमाई

| Updated on: Dec 27, 2019 | 5:10 PM

पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलीत (एसी) लोकलला दोन वर्ष पूर्ण झाले असून या लोकलला प्रवाशांचा प्रचंड (AC local earn big income) प्रतिसाद मिळत आहे.

एसी लोकलमुळे रेल्वेच्या कमाईत भरघोस वाढ, दोन वर्षात 40 कोटींहून अधिक कमाई
Follow us on

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलीत (एसी) लोकलला दोन वर्ष पूर्ण झाले असून या लोकलला प्रवाशांचा प्रचंड (AC local earn big income) प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन वर्षात या लोकलमधून 95 लाख 81 हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. यातून पश्चिम रेल्वेला 40 कोटी 3 लाख रुपयांची वाढ झाली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या (AC local earn big income) अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, 25 डिसेंबर 2017 रोजी पश्चिम रेल्वेवर पहिली एसी लोकल धावली. एसी लोकलला यंदा दोन वर्षे पूर्ण झाली. पहिल्या दिवसापासून एसी लोकल प्रवाशांच्या पसंतीस पडली. त्यानंतर 25 डिसेंबर 2017 ते 15 डिसेंबर 2019 या कालावधीत 95 लाख 81 हजार प्रवाशांनी प्रवास केला.

या 12 डब्यांच्या एसी लोकलच्या दिवसातून 12 फेऱ्या होतात. सहा लोकल फेऱ्या चर्चगेट दिशेकडे तर, सहा लोकल फेऱ्या विरार दिशेकडे धावतात. मात्र ही सेवा सुरूवातीला शनिवार, रविवार वगळता मिळत होती. मात्र 14 सप्टेंबर 2019 पासून दुसरी एसी लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आल्याने प्रवाशांना संपूर्ण आठवडा थंडगार प्रवास मिळत आहे.

या लोकलच्या एका फेरीत सुमारे 1 हजार 500 प्रवासी क्षमता आहे. तर दिवसाला सुमारे 18 हजार प्रवासी प्रवास करतात. एक हजार 28 आसन व्यवस्था असून 4 हजार 936 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता या लोकलमध्ये आहे.

एसी लोकलमध्ये सुरक्षा यंत्रणा आहे. ऑटोमॅटीक दरवाजे, आरामदायक आसन व्यवस्था, प्रत्येक बोगीत अग्निशमन यंत्रणा, जीपीएस सुविधा, प्रवासी संवाद, एलइडी वीज सुविधा, 100 किमी प्रति तास गती आहे.

लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर या ऐसी लोकलला पसंती जरी असली तरी अजून लोकलच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. जेणे करून ऑफिस वेळेत यांची सेवा जास्त मिळेल. त्यामुळे गर्दी अधिक होणार नाही आणि अपघात टळेल, असे मत काही प्रवाशांनी व्यक्त केले आहे.