भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांबद्दल संजय राऊत यांचा खळबळजनक खुलासा, थेट त्यांचे…
महापालिका निवडणुका संपल्या आहेत आणि महापाैरपदावर दावा केला जातोय. मुंबईचा महापाैर नक्की कोण होणार आणि कोणत्या पक्षाचा यावरून लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाकडून मुंबईच्या महापाैर पदासाठी दावा केला जातोय.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. एकनाथ शिंदे यांना फार जास्त गांर्भियाने घेण्याची गरज नसल्याचे सांगताना संजय राऊत दिसले. संजय राऊत यांनी म्हटले की, महापाैर हा महायुतीचाच तर मग साौदेबाजी कशासाठी भ्रष्ट पैशांवर निवडणुका बिनविरोध करून घेतल्या. मुळात म्हणजे असे आहे की, महापाैर पदाला फार अधिकार नाहीत ते शोभेचे पद आहे. विदेशातल्या महापाैरांना अनेक अधिकार असतात, पण आपल्याकडील महापाैरांना असे काही अधिकार नाहीत. या लोकांना स्थायी समितीमध्ये जास्त रस आहे. कारण तिथे पैशांचे व्यवहार होतात. मुळात म्हणजे असं आहे की, ब्लॅकमेल करून दुसऱ्याचे स्वत:च्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न आहे. केडीएमसीमधील आमचे दोन नगरसेवक सध्या कुठे दिसत नाहीयेत, हे खरे आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे कोणत्या चिन्हावर निवडून आले होते. एकनाथ शिंदेंनी आमचे 40 आमदार आमच्या चिन्हावर निवडून आलेले काय केले… तुम्ही जे म्हणतात ना… तुम्हाला काही कल्पना नव्हती का? अशी कल्पना कोणालाच नसते. आपण विश्वास ठेवतो आपल्या माणसावर.. त्यांना उमेदवारी देतो आणि त्यांना ताकद देतो आणि त्यांना मोठं करतो. मग हे असे पक्षांतर करत असतात.
त्यांचा जो बाप आहे तो पक्षांतरातूनच झाला. त्यामुळे आता यांच्यावरती काय विश्वास ठेवणार ना.. भाजपाच्या नगरसेवकावरती वॉच ठेवला. त्या त्या भागातील माणसांना सांगितले की, त्या नगरसेवकांवर लक्ष ठेवा. म्हणून ते घरीच आहेत आणि त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. म्हणजे ते कुठे जात आहेत, ते कोणाशी बोलत आहेत, किंबहुना नगरसेवकांचे फोनही टॅप केली जात आहेत.
राऊतांनी पुढे म्हटले, जर रश्मी शुक्ला नसल्यातरीही प्रक्रिया तीच आहे. ताज लॅन्डच्या कैद खाण्यात जे कोणी आहेत, त्यांचे फोनही टॅप केली जात आहेत. भाजपा देखील आपल्या स्वत:च्याच नगरसेवकांचे फोन टॅप करत आहे. मी तुम्हाला कालच बोललो ना दिल्लीतून चाब्या मारल्यात जात आहेत. मुंबईचा महापाैर कोण हे दिल्लीतून ठरवले जाईल.
