शिवसेनेचाच मुंबईचा महापाैर व्हावा, शिवसैनिकांची थेट इच्छा, बाळासाहेब ठाकरे यांच्या…
राज्यातील महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून आता महापाैर पदावरून रस्सीखेच बघायला मिळत आहे. मुंबई महापाैर पदासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. शिवसेनेचा महापाैर व्हावा, ही शिवसैनिकांची इच्छा आहे.

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून या महापालिका निवडणुकीत भाजपा हाच सर्वात मोठा पक्ष ठरला. जळगाव, धुळे, नागपूर, नांदेड यासह अनेक महापालिकांवर भाजपाने एकहाती सत्ता मिळवली. राज्याची नजर होती ती म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे. मिनी विधानसभा म्हणून या महापालिकेची ओळख राज्यात आहे. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांची युती जाहीर केली आणि एकमेकांना सन्मानपूर्वक जागा दिल्या. दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गटानेही एकत्र महापालिका निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. मुंबई महापालिकेवर भाजपाचा सर्वाधिक जागा निवडून आल्या. मात्र, भाजपाला मुंबई महापालिकेत सत्ता हवी असेल तर शिवसेना ठाकरे गटाची मदत घ्यावीच लागणार आहे. यादरम्यानच एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्ष महापाैर पद हवे असल्याने सांगताच संपूर्ण गणिते बिघडली. पहिल्यांदाच मुंबई महापालिकेवर भाजपाचा महापाैर बसणार आहे.
यादरम्यानच महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला 66 जागा मिळाल्या तर मनसेला 9 जागा मिळाल्या. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचा महापाैर मुंबई महापालिकेवर होणे शक्य नसतानाच मोठे विधान उद्धव ठाकरे यांनी करत थेट म्हटले की, आमच्याच पक्षाचा महापाैर व्हावा, ही आमची इच्छा आहे. एकनाथ शिंदे मुंबई महापालिकेच्या महापाैर पदासाठी दावा करणार असल्याचे स्पष्टच आहे.
शेवटी दिल्लीत निर्णय होणार असून शिवसेना शिंदे गटाचे काही महत्वाचे नेते आज दिल्लीतही जाणार आहेत. 23 जानेवारीपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरूवात होत असल्याने मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच महापाैर व्हावा, अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. याकरिताच शिवसेना शिंदे गटाकडून महापाैर पदासाठी आग्रह धरला जात असल्याचे सांगितले जात आहे.
कोणतीही तडतोड न करता महापाैर हा युतीचाच असणार असल्याचे सांगितले जात आहे. आज दिल्लीमध्ये महापाैर पदाबाबत मोठा निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. मुंबई महापाैर पदाचा मुद्दा राज्यात सुटत नसल्याचे यामध्ये आता दिल्लीचे भाजपा नेते हस्तक्षेप करून आज निर्णय घेतला जाईल. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळाली.
