ठरलं, मुंबई महापालिकेचे महापाैर पद कोणाकडे? हालचालींना प्रचंड वेग, थेट दिल्लीतच…
Mumbai Municipal Corporation Mayor : राज्यातील महापालिका निवडणुका झाल्या असून राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये मोठा तिडा निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे.

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या. शेवटी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान झाले आणि 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागला. या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपाने धमाकेदार कामगिरी केली आणि सर्वाधिक पालिकांवर सत्ता मिळवली. कुठे युती तर काही ठिकाणी स्वतंत्र महापालिका निवडणुका लढताना राजकीय पक्ष दिसले. राज्यातील सर्वाधिक चर्चेत राहिली ती म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक. मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्याकरिता सर्वच पक्षांकडून दावा केला जात होता. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेही एकत्र आले. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने महापालिका निवडणुका एकत्र लढल्या. भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या पक्षाने महापालिकांचे समीकरणे बघून युती केली. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने एकत्र येत लढवली. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपा हाच सर्वात मोठा पक्ष ठरला.
मुंबई महापालिकेत भाजपाचे तब्बल 89 नगरसेवक निवडून आले तर एकनाथ शिंदे गटाचे 29 नगरसेवक निवडून आले. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला शिवसेना शिंदे गटाची मदत घेतल्याशिवाय पर्याय नाही. मुंबई महापालिकेचाच महापाैर होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मोठा डाव टाकला आणि थेट मुंबई महापालिकेवर अडीच वर्षासाठी महापाैर पद मागितले.
भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये महापाैरपदावरून तिडा निर्माण झाला. शिंदेंनी आपल्या सर्व 29 नगरसेवकांना सुरक्षित हॉटेलमध्ये ठेवले. आपले नगरसेवक फोडले जाणार नाहीत, याची खबरदारी शिंदेंकडून घेतली जात आहे. आता नुकताच मुंबई महापालिकेच्या महापाैरपदाबद्दल अत्यंत मोठी अपडेट येत असून मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीमध्ये होणार आहे.
आज महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रमुख नेते दुपारनंतर दिल्लीमध्ये जाणार आहेत. संध्याकाळी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यात संध्याकाळी होणार बैठक होईल. मुंबईतील महापौरपद, स्थायी समिती अध्यक्ष आणि इतर समित्यांबाबतही प्राथमिक चर्चा होणार असल्याची माहिती यादरम्यान मिळत आहे. पालिकेमध्ये सन्मानपूर्वक पदे मिळावी अशी भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांची भूमिका असल्याच कळतंय.
