कंटेनर-स्कॉर्पिओचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

कर्नाटकात कंटेनर स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

कंटेनर-स्कॉर्पिओचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
| Updated on: Aug 27, 2019 | 10:36 AM

सोलापूर : कर्नाटकात कंटेनर स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. संजय चडच, राणी चडच आणि त्यांचा एक वर्षीय मुलगा श्रेयस चडच या तिघांसह अन्य दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

कर्नाटकमधील गुलबर्गात जिल्ह्यात आळंदजवळ हा भीषण अपघात झाला आहे. यात कंटेनरने स्कॉर्पिओला जोरात धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती, की स्कॉर्पिओ गाडीचा अक्षरश: चुराडा झाला.

या अपघातातील सर्व मृत हे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याचे रहिवाशी आहेत. या अपघातामुळे सोलापुरात हळहळ व्यक्ती केली जात आहे.