पुणतांब्यातून पुन्हा शेतकरी संपाची मशाल

अहमदनगर : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर वारंवार सरकारकडून खोटी आश्वासनं मिळत असल्याचा आरोप करत, पुणतांबा गावच्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा संपाची मशाल पेटवण्याचा निर्धार केला आहे. सरकारला जाग आणण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा संप करण्याची तयारी केली आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर शेतकरी आंदोलनाची मशाल पुणतांबा गावातून पेटवली जात आहे. आज मुक्ताई ज्ञानपीठ येथे किसान क्रांती संघटनेच्यावतीने कोअर कमिटीची बैठक […]

पुणतांब्यातून पुन्हा शेतकरी संपाची मशाल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

अहमदनगर : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर वारंवार सरकारकडून खोटी आश्वासनं मिळत असल्याचा आरोप करत, पुणतांबा गावच्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा संपाची मशाल पेटवण्याचा निर्धार केला आहे. सरकारला जाग आणण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा संप करण्याची तयारी केली आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर शेतकरी आंदोलनाची मशाल पुणतांबा गावातून पेटवली जात आहे. आज मुक्ताई ज्ञानपीठ येथे किसान क्रांती संघटनेच्यावतीने कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीसाठी किसान क्रांती कोअर कमिटीचे धनंजय जाधव, जयाजी सूर्यवंशी, सुहास वहाडणे, संदिप गिड्डेसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये 26 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान आंदोलन सुरु करण्यासंदर्भात विचारमंथन केलं जात आहे. देशातील सर्वात पहिल्या शेतकरी संपाची सुरुवात याच पुणतांबा गावातून झाली होती. शेतकरी संपाची हाक 1 जून 2017 रोजी पुणतांबा या गावातून देण्यात आली होती. राज्यभरातील शेतकऱ्यांनी संपात सहभागी होत राज्य सरकारला कर्जमाफी देण्यास भाग पाडले होते. मात्र अजूनही त्यावेळी सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्याने पुन्हा एकदा किसान क्रांती संघटनेच्या माध्यमातून पुणतांबा गावात आंदोलनाची मशाल पेटवली जाणार असल्याची माहिती जयाजी सूर्यवंशी यांनी दिली.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, दुधाला हमीभाव, शेतकऱ्यांच्या मालाला जाहीर केलेला हमीभाव या निर्णयांच्या अमंलबजावणीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला  आहे. मात्र मागील वेळी झालेल्या गटातटाच्या राजकारणामुळे यावेळी राज्यभरातील किती संघटना आणि शेतकरी यात सहभागी होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे पुणतांब्याचे सरपंच तथा मागच्या आंदोलनात सोबत असणारे धनंजय धनवटे, बाळासाहेब चव्हाण यांनी मात्र स्वार्थासाठी आणि निवडणुका जवळ आल्याने हा अट्टाहास असल्याचा आरोप केला.

“किसान क्रांतीचे दुसरं पर्व सुरु होत आहे. मागील आश्वासनं पूर्ण न झाल्याने पुन्हा आंदोलन सुरु करणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी आश्वासन पूर्ण करा”, असं आवाहन जयाजी शिंदे यांनी केलं.

यावेळी शेतकरी आंदोलनात कोकण विभागातूनही शेतकरी बांधव सहभागी होणार असल्याचा दावा जयाजी शिंदे यांनी केला. आम्ही शेतकऱ्यांचा जाहीरनामा बनवणार आहोत. ज्या संघटनेला हा जाहीरनामा मान्य होईल ते पाठिंबा देऊन सहभागी होतील, असं जयाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 26 जानेवारीपासून यात्रा सुरु करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कधी फसवलं हे आम्हाला समजलंच नाही. मात्र आता जरी गट तट असतील तर त्याला कारणीभूत मुख्यमंत्रीच असतील. मोदी सरकारने ठरवलं तर ते निर्णय घेऊ शकतात. आम्ही सरकारकडे जाणार नाही, मागे आमची चूक झाली पण आता नाही. तसेच या संपात अजित नवले, राजू शेट्टींसह सगळ्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांना भेटून सहभागी करून घेणार असल्याचं जयाजी शिंदे म्हणाले.

Non Stop LIVE Update
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.