PM Modi Interview : ‘ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी मी बोलणार नाही, कारण…’, मोदींनी नेमकं काय म्हटलं?
Prime Minister Narendra Modi Exclusive Interview : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत असलेल्या मैत्रीपूर्व संबंधांवर भाष्य केलं आहे. यासह उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा उत्तराधिकारी मानता? असा पंतप्रधान मोदींना सवाल केला असता यावर बोलताना त्यांनी एक आठवणही सांगितली.
एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हही बहाल झालं. या घडामोडींनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत असलेल्या मैत्रीपूर्व संबंधांवर भाष्य केलं आहे. यासह उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा उत्तराधिकारी मानता? असा पंतप्रधान मोदींना सवाल केला असता यावर बोलताना त्यांनी एक आठवणही सांगितली. मोदी महणाले, बायोलॉजिकली उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे चिरंजीव आहे. तो माझा विषयच नाही. ते आजारी होते. तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी वहिनीला रोज फोन करून विचारायचो. ऑपरेशन पूर्वी त्यांनी मला फोन केला होता. म्हणाले, भाईसाब काय सल्ला आहे. मी म्हटलं, तुम्ही ऑपरेशन करा. बाकी चिंता सोडा. आधी शरीराकडे लक्ष द्या. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. ते माझं शत्रू नाही. उद्या संकट आलं तर त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेल. एक कुटुंब म्हणून. पण बाळासाहेबांचे विचार आहे. त्यासाठी मी जगेल. बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज कधीच विसरु शकत नाही, असे मोदींनी सांगितले तर आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहे. तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. ती मी बाळासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. आम्ही मागच्या निवडणुकीत आमनेसामने लढलो होतो. मी त्या निवडणुकीत बाळासाहेबांबद्दल एक शब्दही बोललो नव्हतो. मी जाहीरपणे म्हणाालो होतो की, मला उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी मी बोलणार नाही. कारण माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

