PM Modi Interview : म्हणून राम मंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, काय होता हिडन अजेंडा?; मोदींनी केला गौप्यस्फोट
Prime Minister Narendra Modi Exclusive Interview : 'प्रभू रामाला हे इतकं कमी सामर्थ्यवान मानतात का? परमपिता परमेश्वारावर कोणी अधिकार गाजवतो का? राम एवढा महान व्यक्ती होता. छोटीसी भाजप पार्टी प्रभू रामासमोर काहीच नाही. खरंतर प्रभू राम त्यांचाही झाला पाहिजे. सर्वांचे झाले पाहिजे. त्यावर कुणाची मालकी नाही', मोदींनी काँग्रेसला घेरलं
भाजपला राम मंदिरावर हक्क बजावयाचा आहे, त्यामुळे अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला काँग्रेस गेली नाही, असा आरोप विरोधकांकडून झाल्याचे पाहायला मिळाले, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल केला असता मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत चांगलंच घेरलं. मोदी म्हणाले, प्रभू रामाला हे इतकं कमी सामर्थ्यवान मानतात का? परमपिता परमेश्वारावर कोणी अधिकार गाजवतो का? राम एवढा महान व्यक्ती होता. छोटीसी भाजप पार्टी प्रभू रामासमोर काहीच नाही. खरंतर प्रभू राम त्यांचाही झाला पाहिजे. सर्वांचे झाले पाहिजे. त्यावर कुणाचा मालकी हक्क होऊ शकत नाही, असे मोदी म्हणाले. काँग्रेसचा त्यांच्या हिडन अजेंड्यावर पडदा टाकण्यासाठीच हा बहाणा करत आहे. त्यांचा हिडन अजेंडा म्हणजे त्यांना त्यांची व्होट बँक सांभाळायची आहे. त्यामुळे ते या प्रकारची बहाणेबाजी करत आहेत. त्यांना वाटतंय राम मंदिरात गेलो तर व्होट बँकही जाईल. व्होटबँक सवाल करेल. त्यांना त्याची भीती आहे. राजीव गांधी यांनी एकदा निवडणुकीचं कॅम्पेन अयोध्येतून सुरू केलं होतं. त्यांनी सिग्नल दिला होता. तेव्हा त्यांच्या व्होटबँकेने सांगितलं की, तुम्ही हा खेळ खेळला तर तुमच्यात आणि भाजपमध्ये काय फरक राहिला? त्यानंतर काँग्रेसवाले पळून गेले, असं मोदींनी सांगितंलं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

