AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi TV9 Interview : ठाकरे शत्रू नाहीत, TV9 च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?

PM Modi TV9 Interview : ठाकरे शत्रू नाहीत, TV9 च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?

| Updated on: May 03, 2024 | 10:12 AM
Share

Prime Minister Narendra Modi Exclusive Interview : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही ९ ला महामुलाखत दिली. यामध्ये मोदींना शरद पवार शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीवरून थेट सवाल करण्यात आलेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीमुळे सहानुभूतीचा फटका भाजपला बसेल का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिली. या महामुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षफुटीवर सवाल केलेत. उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुत्र असल्याने त्याचा आदरत आहे. तर जेव्हा उद्धव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा त्यांना मदत करणारा पहिला मीच असेल, असेही मोदी म्हणाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही ९ ला महामुलाखत दिली. यामध्ये मोदींना शरद पवार शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीवरून थेट सवाल करण्यात आलेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीमुळे सहानुभूतीचा फटका बसेल का? यावर उत्तर देताना मोदी म्हणाले, ही इमोशनल परिस्थिती युतीच्या बाजूने आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आमच्यासोबत आहे. अधिकृत राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे. त्यामुळे लोकांना वाटतंय की कुटुंबाच्या सत्तेच्या हव्यासापायी बाळासाहेबांचं स्वप्न यांनी का मोडलं. कुटुंबाच्या भल्यासाठी? आपल्या मुलाला इस्टॅब्लिश करण्यासाठी? बाळासाहेबांचा एवढा मोठा वारसा. बाळासाहेबांनी शिवसैनिकांसाठी जीवन अर्पण केलं होतं. त्यांची शिवसेना आज आमच्यासोबत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदार आमच्यासोबत भावनने जोडलेला गेलाय, असे म्हणत जनता भाजपच्यासोबत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Published on: May 03, 2024 10:12 AM