नगरमध्ये 4 निगेटिव्ह रुग्णांची कोरोना चाचणी 14 दिवासांनी पॉझिटिव्ह

| Updated on: Apr 23, 2020 | 2:49 PM

अहमदनगरमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, आता आणखी (Ahmednagar four negative patient found again corona positive) चिंता वाढली आहे.

नगरमध्ये 4 निगेटिव्ह रुग्णांची कोरोना चाचणी 14 दिवासांनी पॉझिटिव्ह
Follow us on

अहमदनगर : अहमदनगरमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, आता आणखी (Ahmednagar four negative patient found again corona positive) चिंता वाढली आहे. कारण निगेटिव्ह असलेले 4 रुग्ण 14 दिवसांनी पॉझिटिव्ह आल्याने, एकच खळबळ उडाली आहे. संगमनेर शहरातील 4 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांचे रिपोर्ट 14 दिवसांपूर्वी निगेटिव्ह आले होते. आता एकाच दिवशी हे चौघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चिंता वाढली आहे.

नेपाळला गेलेल्या 14 जणांची चाचणी केली असता, त्यापैकी चौघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा शल्यचिकीत्सक प्रदिप मुरंबीकर यांनी याबाबतची माहिती दिली.

“संगमनेर येथील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 37 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 20 जणांना डिस्चार्ज दिला आहे तर कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे”, अशी माहिती नगर जिल्हा माहिती कार्यालयाने दिली.

जामखेडमध्ये 6 मेपर्यंत लॉकडाऊन

हॉटस्पॉट केंद्र असलेल्या जामखेड शहर क्षेत्रातील प्रतिबंधाची मुदत आता ६ मे, २०२० पर्यंत वाढवली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. कोरोनाबाधित दोन रुग्ण आढळल्याने वाढ करण्यात आली. सर्व आस्थापना,दुकाने, अत्यावश्यक सेवा,वस्तू विक्री इत्यादी बंद राहणार आहे.

जामखेड येथील दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. काही दिवसापूर्वी मृत्यू पावलेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले कोरोनाबाधीत झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या या दोन युवकांना आता लागण झाली आहे.

नगर जिल्ह्यात जामखेड 11 तर संगमनेरमध्ये 8 कोरोनाबाधित रुग्णसंख्या झाली आहे.

नगरमधील कोरोनाबाधित रुग्णसंख्या

  • नगर शहर – ९
  • जामखेड – ११
  • संगमनेर – ८
  • आलमगीर – ०३
  • नेवासा – ०३
  • राहाता – ०१ लोणी
  • कोपरगाव – ०१
  • आष्टी ( जि. बीड ) – ०१
  • एकूण – ३७

(Ahmednagar four negative patient found again corona positive)

संबंधित बातम्या 

कोरोना पाठोपाठ सारीचंही संकट, अहमदनगरसह जालना आणि नाशिकमध्येही फैलाव